दिल्ली, 13 फेब्रुवारी : शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती गेल्या 6 महिन्यापासून निर्णय प्रलंबित आहे. पण आता 14 फेब्रुवारीला म्हणजे उद्यापासून सुप्रीम कोर्टामध्ये नियमित सुनावणी होणार आहे. शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका ही लिस्ट झाली असून सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्राचा सत्तासंघर्षावर अखेर सुप्रीम कोर्टात 14 फेब्रुवारीपासून घटनापिठापुढे सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापिठापुढे ही सुनावणी होणार आहे. घटनापिठात न्याय. शहा,न्याय. मुरारी,न्याय. हिमा कोहली आणि नाय. नार्सिंमा यांचा समावेश आहे. उद्या सुप्रीम कोर्टाच्या सुचीमध्ये सकाळी १०.३० वाजता ५०१ क्रमांक देण्यात आलेला आहे.
(...तर एक दिवस जनता राजभवनातच घुसली असती, जाता जाता सेनेचं कोश्यारींवर टीकास्त्र)
सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडले. 40 आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि भाजपच्या मदतीने सरकार देखील स्थापन केले. मात्र हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते.
('...त्यादिवशी राज्यपाल रात्री साडेदहा पर्यंत जागे', शिवसेनेने सांगितली कोश्यारींची दुखरी आठवण!)
सत्तासंघर्षप्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली होती. त्यामुळे या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता होती. पण आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे गेलं आहे. त्यामुळे केस लांबणीवर पडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news, Supreme court