कुठेही पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ लोकांना मदत मिळावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आले आहे . जिल्ह्यातील पूर बाधित राजापूर खेड, चिपळून अशा नगर पालिका आणि नदी खाडी किनारपट्टीवरील लोकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी सर्व उपाययोजना करून झाले आहे. तसेच यापूर्वी जिल्ह्यातील धोकादायक वस्तूंचे स्थलांतर करण्यात आले आहे. हेही वाचा- मुंबईत पावसाचा Break, पण कशी असेल आजची पावसाची स्थिती; जाणून घ्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने कोणीही समुद्रकिनारी जाऊ नये अशा सूचना देण्यात आले आहेत. समुद्राला मोठे उधाण असल्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे.रत्नागिरीत मुसळधार पाऊस; दोन दिवस रेड अलर्ट, NDRFचे पथक दाखल pic.twitter.com/0GR1NUoyjA
— News18Lokmat (@News18lokmat) June 13, 2021
खेडमध्ये ही NDRF चे पथक दाखल झाले आहे. जगबुडी नदी किनारी असलेल्या खेड शहरात दरवर्षी पुराचे पाणी शिरते आणि खेड शहरातील निम्मा भाग पाण्याखाली जातो. त्या सर्व पूर प्रणव क्षेत्राची शनिवारी संध्याकाळी उशिरा NDRF च्या पथकाने पाहणी केली. खेड नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी पुराचा धोका असलेल्या खेड शहरातील सफा मशीद चौक , पान गल्ली, गुजर आळी, गांधी चौक , नावाचा तळ, तीन बत्ती नाका , खेड दापोली मार्गावरील एकविरा नगर परिसरात जाऊन पाहणी केली.रत्नागिरी जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट, सर्व यंत्रणा सतर्क @News18lokmat pic.twitter.com/dKknLTs8Rd
— News18Lokmat (@News18lokmat) June 13, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.