जाहिरात
मराठी बातम्या / देश / साधी राहणी उच्च विचारसरणी; मोदींच्या मातोश्रींच्या प्रकृतीबद्दल आहारतज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं मत

साधी राहणी उच्च विचारसरणी; मोदींच्या मातोश्रींच्या प्रकृतीबद्दल आहारतज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं मत

साधी राहणी उच्च विचारसरणी; मोदींच्या मातोश्रींच्या प्रकृतीबद्दल आहारतज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं मत

18 जूनला (18 June 2022) त्या शंभरीत प्रवेश केला आहे. फार थोड्या व्यक्तींना निरोगी दीर्घायुष्य लाभतं. मोदी यांच्या मातोश्री त्यापैकीच एक आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M. Narendra Modi) नियमित व साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात. पहाटे लवकर उठणं, व्यायाम, आहार या सर्वच बाबतीत ते अतिशय काटेकोर असतात. त्यांचा हा गुण निश्चितच त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला असणार. कारण  मोदी यांच्या  आई हिराबेन मोदी (P. M. Modi’s Mother Hiraben Modi) (हिराबा) गेली अनेक वर्षं हीच जीवनशैली अंगीकारून जगत आहेत. त्यामुळेच  18 जूनला (18 June 2022) त्या शंभरीत प्रवेश केला आहे. फार थोड्या व्यक्तींना निरोगी दीर्घायुष्य लाभतं. मोदी यांच्या मातोश्री त्यापैकीच एक आहेत. 18 जूनला पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबा यांनी शंभराव्या वर्षात (Entering In 100th Year) प्रवेश केला आहे. या वयातही त्यांचं आरोग्य उत्तम (Healthy Life) आहे. अजूनही त्या कोणत्याही आधाराविना चालू शकतात. तसंच स्वतःची सर्व कामं करू शकतात. सध्या त्या आपले धाकटे पुत्र पंकज यांच्यासोबत गांधीनगरमध्ये राहतात. आजही त्या घरातलं जेवणच जेवतात. खिचडी, वरण-भात असं साधं जेवण त्यांच्या  आहारात असतात. गोड पदार्थांमध्ये त्यांना लापशी खूप आवडते.  नरेंद्र मोदी  स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आईला भेटायला येतात, तेव्हाही खडीसाखर किंवा लापशीनंच त्यांचं तोंड गोड केलं जातं. हिराबांना भेटायला नरेंद्र मोदी येतात, तेव्हाच्या जेवणातही वरण-भात, भाजी-पोळी, सॅलड असं साधं अन्नच असतं.

News18लोकमत
News18लोकमत

अहमदाबादच्या एक आहारतज्ज्ञ म्हणतात, की हिराबेन यांनी शंभरीत प्रवेश केला असला, तरी त्या अजून निरोगी आहेत. कारण त्या आजारी पडल्याचं फारसं कधी ऐकलं नाही. सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा त्यांचं आरोग्य खूपच चांगलं आहे. त्या नेहमी घरातलं साधं जेवणच जेवतात. हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

सहा महिन्यांपूर्वी गांधीनगरच्या महापालिका निवडणुकीवेळीही मतदान करण्यासाठी हिराबेन स्वतः शाळेपर्यंत गेल्या होत्या. इतकंच नाही, कोरोना महामारीच्या काळात लशीबाबत नागरिकांच्या मनात साशंकता असताना त्यांनी स्वतः लस घेऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

केवळ दीर्घायुष्य मिळण्यापेक्षा ते निरोगी असलं तर त्याला काही अर्थ असतो. त्यासाठी घरच्या साध्या जेवणाचा आग्रह आपण धरला पाहिजे. बदललेल्या जीवनशैलीतल्या चुकीच्या गोष्टींना न भुलता आरोग्यपूर्ण जीवनाचा स्वीकार केला पाहिजे. साधी राहणी आणि आहाराविहाराची काळजी घेतली, तर सर्वसामान्य व्यक्तीलाही निरोगी दीर्घायुष्य मिळू शकतं, याचं मोदी यांच्या आई हिराबा या उत्कृष्ट उदाहरण आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात