हिंदू धर्मासाठी 9 वर्षे तपश्चर्या! मुस्लीम तरुणासह कुटुंबातील 35 जण झाले हिंदू

हिंदू धर्मासाठी 9 वर्षे तपश्चर्या! मुस्लीम तरुणासह कुटुंबातील 35 जण झाले हिंदू

हिंदू युवा वाहिनीच्या मदतीनं एका तरुणासह 35 जणांनी मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला.

  • Share this:

पानीपत, 24 जून : तब्बल 9 वर्षांची तपश्चर्या करून एका तरुणासाह त्याच्या कुटुंबातील 35 जणांना हिंदू धर्म स्वीकारला  आहे. हिंदू युवा वाहिनीच्या मदतीनं एका तरुणासह 35 जणांनी मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. यासाठी त्यांनी 9 वर्ष तपश्चर्या केली. ही घटना हरियाणातील पानीपत इथे घडली आहे.

आम्ही हे धर्मांतर स्वेच्छेनं केलं असल्याचं या कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं आहे. पानीपतच्या आसनगावात राहणाऱ्या मुस्लीम कुटुंबाने हिंदू धर्म स्वीकारला आहे. कुटुंब प्रमुखांनी यासाठी हरिद्वार आणि गुगा मेडी इथे जाऊन ही तपश्चर्या केली. नसीब धर्मांतर करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. धर्म स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. आम्ही स्वेच्छेनं धर्मातर केल्याचं कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं.

हे वाचा-मोठी बातमी! ऑगस्टपर्यंत नाही सुरू होणार सामान्य रेल्वे? परिपत्रकातून दिले संकेत

बऱ्याचदा धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातो. मुघल साम्राज्यात बळजबरीनं धर्मातर केली जात केली होती. मात्र हरियाणात स्वेच्छेनं हिंदू धर्म स्वीकारला आहे. नसीबसह 35 जणांना युवा हिंदू वाहिनीसोबत संपर्क साधला होता. त्यानंतर विधीवत पद्धतीनं नसीबसह कुटुंबीयांना तपश्चर्या कऱण्याबाबत सांगण्यात आले. 9 वर्षांच्या तपश्चर्येनंतर हिंदू धर्म स्वीकारल्याची माहिती युवा हिंदू वाहिनीच्या जिल्हाध्यक्ष सुनील आर्य यांनी माहिती दिली आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 24, 2020, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading