गुजरात, 18 मे: हार्दिक पटेलने (Hardik Patel) अखेर आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा (Resigned) दिला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly elections) काँग्रेससाठी (Congress party today) हा मोठा धक्का आहे. काँग्रेसचा राजीनामा देताना हार्दिक पटेलने काँग्रेस पक्षावर (Congress party) जोरदार हल्ला चढवला आहे. हार्दिक पटेल काही काळापासून काँग्रेस नेत्यांवर नाराज होते आणि ते पक्ष सोडणार असल्याची चाहूल आधीच बांधली जात होती.
गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज होते आणि सातत्याने प्रदेश नेते आणि हायकमांडला सवाल करत होते. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना हार्दिक पटेलच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेस सोडताना हार्दिक पटेलने ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, मला विश्वास आहे की माझ्या या निर्णयाचे प्रत्येक सहकारी आणि गुजरातमधील लोक स्वागत करतील, मला विश्वास आहे की या पाऊलानंतर माझ्याकडून, मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.
आज मैं हिम्मत करके कांग्रेस पार्टी के पद और पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देता हूँ। मुझे विश्वास है कि मेरे इस निर्णय का स्वागत मेरा हर साथी और गुजरात की जनता करेगी। मैं मानता हूं कि मेरे इस कदम के बाद मैं भविष्य में गुजरात के लिए सच में सकारात्मक रूप से कार्य कर पाऊँगा। pic.twitter.com/MG32gjrMiY
हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यानं नक्कीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.