नवी दिल्ली, 09 एप्रिल: मुंबई दहशतवादी (terror attacks) हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद (Hafiz Saeed) चा मुलगा हाफिज तलहा सईद (Hafiz Talha Saeed) याला गृह मंत्रालयानं नियुक्त दहशतवादी घोषित केलं आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तलहा हा लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) वरिष्ठ नेता आणि मौलवी शाखेचा प्रमुख होता. विशेष म्हणजे तलहाविरोधात ही कारवाई अशा दिवशी करण्यात आली आहे, जेव्हा पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी न्यायालयानं जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदलाही 31 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. भारतीय गृह मंत्रालयानं लष्कर-ए-तैयबा (LeT) प्रमुख हाफिज मोहम्मद सईदचा मुलगा हाफिज तलहा सईद याला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 [Unlawful Activities (Prevention) Act, 1967] च्या तरतुदींनुसार नियुक्त दहशतवादी म्हणून घोषित केलं. हाफिज तलहा सईद हा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या मौलवी शाखेचा प्रमुख आहे. या संदर्भात गृह मंत्रालयानं शनिवारी सविस्तर अधिसूचना जारी केली.
MHA issues a notification declaring Hafiz Talha Saeed, son of Hafiz Mohammad Saeed, a senior leader of Lashkar-e-Taiba (LeT) and head of the cleric wing of the LeT, as a designated terrorist under the provisions of the UAPA Act 1967 pic.twitter.com/Cxo2OKtoqf
— ANI (@ANI) April 9, 2022
अधिसूचनेनुसार, तलहा सईद भारत आणि अफगाणिस्तानमध्ये भारताच्या हितसंबंधांवर भरती करणं, निधी उभारणे, योजना आखणे आणि हल्ले करणे यात सक्रियपणे सहभागी होता. हाफिज तलहा सईद भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी निधी गोळा करणं, दहशतवाद्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतो. भारत आणि अफगाणिस्तानमधील भारतीय मालमत्तेला लक्ष्य करण्याचा तो सतत विचार करत असतो. तलहा सईद पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाच्या तळांना वारंवार भेटी देतो आणि येथे आपल्या भाषणांमध्ये भारत, अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध जिहाद पुकारतो. सरकारी कार्यालयात Mobile फोनच्या वापराबाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय हाफिज तलहा सईदचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये तो भारतविरोधी बोलताना दिसतो. 2017 मध्ये त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो म्हणत होता की जम्मू-काश्मीरमध्ये जिहाद होईल. लष्कर-ए-तैयबा ही पाकिस्तानातून कार्यरत असलेली दहशतवादी संघटना आहे, ज्याची स्थापना तलहाचे वडील हाफिज मुहम्मद सईद यांनी केली होती. या दहशतवादी संघटनेचा उद्देश भारतात आणि विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवणं हा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हाफिज सईदच्या घराजवळ स्फोट झाला तेव्हा तलाह शेवटचा दिसला होता. या स्फोटातील जखमींना भेटण्यासाठी तलहा सईद लाहोरमधील रुग्णालयात पोहोचला होता. विशेष म्हणजे केंद्र सरकारनं ऑगस्ट 2019 मध्ये UAPA मध्ये सुधारणा केल्या होत्या. यानंतर कायद्यात एक तरतूद जोडण्यात आली, ज्यानुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित केलं जाऊ शकते. यापूर्वी केवळ संघटनांनाच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं जात होतं. दुरुस्तीनंतर मंत्रालयाने यूएपीए कायद्याच्या तरतुदीनुसार 9 जणांना दहशतवादी घोषित केलं होतं. त्याच वेळी, सप्टेंबर 2019 मध्ये सरकारने मौलाना मसूद अझहर, हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी आणि दाऊद इब्राहिम यांना दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं. हाफिज सईदला 32 वर्षांची शिक्षा याआधी शुक्रवारी पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने हाफिज सईदबाबत मोठा निकाल दिला. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याला आणखी दोन दहशतवादी फंडिंग प्रकरणात न्यायालयाने 32 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी, 70 वर्षीय दहशतवादी हाफिज सईला इतर 5 टेरर फंडिंग प्रकरणात 36 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशाप्रकारे हाफिज सईदला आतापर्यंत एकूण 68 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी न्यायालय (ATC) न्यायाधीश एजाज अहमद भुत्तर यांनी हाफिज सईदला पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने 21/2019 आणि 90/2019 या दोन FIR मध्ये 32 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. IPL 2022, SRH vs CSK : चेन्नईच्या टीममध्ये होणार बदल ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ला मिळणार संधी पाकिस्तानी दहशतवादविरोधी न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, यापूर्वी 21/19 आणि 99/21 मध्येही त्याला अनुक्रमे 15.5 वर्षे आणि 16.5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. कोर्टाने सईदला 3.4 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हाफिज सईदला लाहोरच्या कोट लखपत तुरुंगातून न्यायालयात आणण्यात आले, जिथे तो 2019 पासून कडेकोट सुरक्षेत कैद आहे. यूएनने नामांकित दहशतवादी सईदवर अमेरिकेने 10 दशलक्ष डॉलर्सचे इनाम ठेवलं आहे. हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) या 2008 च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दोन दहशतवादी संघटना आहेत.