जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / सरकारी कार्यालयात Mobile फोनच्या वापराबाबत सरकारनं घेतला 'हा' मोठा निर्णय

सरकारी कार्यालयात Mobile फोनच्या वापराबाबत सरकारनं घेतला 'हा' मोठा निर्णय

सरकारी कार्यालयात Mobile फोनच्या वापराबाबत सरकारनं घेतला 'हा' मोठा निर्णय

अधिकृत निवेदनानुसार, सरकारनं म्हटलं आहे की, लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी दिली जाईल. राज्य सरकारनं (state government) गेल्या महिन्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगढ, 09 एप्रिल: पंजाब सरकारनं (Punjab government) सरकारी कार्यालयांमध्ये मोबाईल फोनच्या (mobile phones in government offices) वापराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता पंजाबमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये लोकं मोबाईल फोन सोबत घेऊन जाऊ शकणार आहेत. अधिकृत निवेदनानुसार, सरकारनं म्हटलं आहे की, लोकांना सरकारी कार्यालयांमध्ये मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी दिली जाईल. राज्य सरकारनं (state government) गेल्या महिन्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. ज्याद्वारे लोक भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे ऑडिओ किंवा व्हिडिओ पाठवू शकतात. काही कार्यालयांमध्ये सर्वसामान्य जनतेला मोबाईल घेऊन येण्यास पूर्ण बंदी असल्यानं त्यांना प्रचंड त्रास होत असल्याचंही सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. हे पाहता यापुढे मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी असणार नाही, मात्र ज्या कार्यालयांमध्ये हे बंधनकारक आहे, तेथे काही सुरक्षेच्या कारणास्तव या संदर्भात अंशत: बंदी लागू केली जाऊ शकते. सर्व कर्मचार्‍यांनी वक्तशीरपणाची खात्री करण्यासाठी सर्व प्रशासकीय सचिव, विभागीय आयुक्त आणि उपायुक्तांना मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. IPL 2022, SRH vs CSK : चेन्नईच्या टीममध्ये होणार बदल ‘मराठवाडा एक्स्प्रेस’ला मिळणार संधी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सर्व प्रशासकीय सचिव, विभागप्रमुख, विभागीय आयुक्त आणि उपायुक्तांना सर्व अधिकारी/कर्मचार्‍यांनी वक्तशीर राहण्याचे तपशीलवार निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक व्यवहार कार्यालयात येणार्‍या प्रत्येकाला सामान्य लोकांना भेटण्यासाठी वेळ निश्चित करण्याबरोबरच योग्य वागणूक आणि मार्गदर्शन करण्यास सांगितलं आहे. जेव्हापासून सरकारने लोकांना भ्रष्टाचार संपवण्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सांगितले आहे, तेव्हापासून अनेक सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Punjab
  • First Published :
जाहिरात
जाहिरात