मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनानंतर आता Bird Ffluमुळे देशात पहिला बळी; H5N1 मुळे 18 दिवसांतच 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

कोरोनानंतर आता Bird Ffluमुळे देशात पहिला बळी; H5N1 मुळे 18 दिवसांतच 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Delhi) H5N1 म्हणजेच एव्हिएन इन्फ्लुएंझाची (H5N1 Avian influenza) लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Delhi) H5N1 म्हणजेच एव्हिएन इन्फ्लुएंझाची (H5N1 Avian influenza) लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Delhi) H5N1 म्हणजेच एव्हिएन इन्फ्लुएंझाची (H5N1 Avian influenza) लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 20 जुलै : एकिकडे देशात कोरोनाव्हायरस (Coronavirus) थैमान घालतो आहे. किती तरी जणांचा या विषाणूने बळी घेतला आहे. त्यातच आता आणखी एका व्हायरसने देशात पहिला बळी घेतला आहे. अवघ्या 11 वर्षांच्या मुलाचा H5N1 म्हणजेच एव्हिएन इन्फ्लुएंझामुळे (H5N1 Avian influenza) मृत्यू झाला आहे. 18 दिवसांतच या आजारामुळे मुलाचा जीव गेला आहे.

11 वर्षांच्या मुलाला H5N1 ची लागण झाली होती. 2 जुलै रोजी त्याला दिल्लीतील एम्स (AIIMS Delhi) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज 20 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. यानंतर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व स्टाफला आयसोलेट करण्यात आलं आहे. या वर्षात  H5N1 चा हा देशातील पहिला बळी आहे.

H5N1 हे एव्हियन एन्फ्लुएंझा म्हणजे बर्ड फ्लू (Bird flu). बर्ड फ्लूच्या अनेक स्ट्रेन्स आहेत. त्यापैकी H7N3, H7N7, H7H9, H9N2 आणि H5N1 या पाच स्ट्रेन्सचा माणसांनाही संसर्ग होतो. त्यापैकी H5N1 ही आतापर्यंतची सर्वांत धोकादायक स्ट्रेन मानली जाते. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी हा विषाणू सतत स्ट्रेन बदलत राहतो. त्याच्यावर वेळीच इलाज झाला नाही, तर ते प्राणघातक ठरू शकतं.

हे वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर 5 तासांतच मारला लकवा! आता डोळाही बंद होईना

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, एव्हियन एन्फ्लुएंझाचे (Avian Influenzas) पहिले रुग्ण 1997 मध्ये सापडले होते. संसर्ग झालेल्या जवळपास 60 टक्के नागरिकांचे प्राण गेले. त्यात सर्दी, श्वास घेण्यात अडथळा, कंजंक्टिव्हायटिस, घशात सूज, वारंवार उलटी होणं अशी लक्षणं दिसत होती.

हे वाचा - दिल्लीकरांना 'ती' चूक महागात; केजरीवाल सरकारचा दणका! मुंबईकरांनो तुम्ही तरी आवरा

जिथं पक्ष्यांची/कोंबड्यांची संख्या जास्त असते, तिथं हा विषाणू पसरण्याची शक्यता जास्त असते. पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या श्वासाच्या मार्गे विषाणू शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे पोल्ट्रीत काम करणाऱ्यांवर याचा सर्वांत पहिल्यांदा परिणाम दिसतो. त्यानंतर कोंबड्या खरेदी करणाऱ्या व्यक्ती, तसंच अर्धवट शिजलेलं मांस खाणाऱ्या व्यक्तींना या विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असते.

First published:

Tags: Bird flu, Disease symptoms, Health, Lifestyle, Serious diseases