दिल्लीकरांना 'ती' चूक पडली महागात; केजरीवाल सरकारने दिला दणका! मुंबईकरांनो तुम्ही तरी आवरा

कोरोनाला रोखण्यासाठी दिल्लीत जी वेळ आली आहे, ती मुंबईत येऊ देऊ नका.

कोरोनाला रोखण्यासाठी दिल्लीत जी वेळ आली आहे, ती मुंबईत येऊ देऊ नका.

  • Share this:
    नवी दिल्ली, 20 जुलै : दिल्लीत कोरोना रुग्णांचा (Delhi corona cases) आकडा घटला आहे. त्यानंतर लोक सर्रासपणे नियमांचं (Corona rule) उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे धोका अद्याप टळला नाही. बाजारांमध्ये लोकांनी तोबा गर्दी (Crowd in market) केली आहे. यावेळी कोणत्याही कोरोना नियमांचं पालन केलेलं नाही. सोशल डिस्टन्सिंगचा (Social distancing) फज्जा उडालेला दिसून येतो. कुणाच्या चेहऱ्यावर मास्कही दिसला नाही. त्यामुळे आता कोरोना नियम सर्रासपणे पायदळी तुडवणाऱ्या दिल्लीकरांना केजरीवाल सरकारने मोठा दणका दिला आहे. दिल्लीतीलमहत्त्वाचे बाजार बंद (Delhi market closed) करण्यात आले आहेत. दिल्लीतील कोरोनाला रोखण्यासाठी आता DDMA म्हणजेच दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अॅक्शनमध्ये आलं आहे.  दिल्लीतील कमला नगरमघील कोल्हापूर रोड बाजार आणि इनर सर्कल बाजार बुधवारी रात्री आठपर्यंत बंद करण्यात आले आहेत. पण अत्यावश्यक सेवातच सुरू राहतील, असं सरकारनं सांगितलं आहे. आदेशानुसार 19  जुलै रात्री आठपासून 21 जुलै रात्री आठपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत दुकानं बंद राहतील. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारावर आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही सरकारने दिला आहे. हे वाचा - Coronavirus: कोल्हापूर, सांगलीत संपूर्ण Lockdown करा, केंद्रीय टीमचा सल्ला दिल्लीतील जी परिस्थिती पाहता बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशीच परिस्थिती मुंबईतही दिसून येते आहे. मुंबईतील दादर मार्केट आणि क्रॉफर्ड मार्केट या दोन मार्केटमध्ये गर्दी असते. काही दिवसांपूर्वीच क्रॉफर्ड मार्केटमध्येही अशीच भयानक गर्दी दिसून आली होती. त्यामुळे दिल्लीमध्ये जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत, तसे निर्बंध मुंबईत लागू होण्यातही फार वेळ लागणार नाही. सध्या मुंबईत सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची मुभा आहे. पण जर मुंबईच्या मार्केटमधील परिस्थितीही अशीच राहिली तर मुंबईतही दिल्लीप्रमाणे बाजार बंद होतील. संपूर्ण लॉकडाऊनचा केंद्राचा सल्ला राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Pandemic) कमी होताना दिसत आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील (Maharashtra) काही जिल्ह्यांत अद्यापही कोरोना बाधितांची संख्या ही अधिक असल्याचं दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता केंद्रीय टीमने नुकताच या दोन्ही जिल्ह्यांचा दौरा केला. हा दौरा केल्यानंतर केंद्रीय टीमने राज्यसरकारला एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. हे वाचा - सावध व्हा! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर WHO नं पुन्हा दिला इशारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचा दौरा करुन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय टीमने या दोन्ही जिल्ह्यांतील कोरोनाची वाढत्या संख्येवरुन चिंता व्यक्त केली आहे. तसेच या दोन्ही जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा सल्लाही दिला आहे. तर राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय टीमच्या अहवालाची वाट पाहत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published: