Home /News /national /

ज्ञानवापी मशिदीत तीन दिवस सर्वेक्षण, शिवलिंग आढळल्याचा हिंदू पक्षाचा दावा, फोटो समोर

ज्ञानवापी मशिदीत तीन दिवस सर्वेक्षण, शिवलिंग आढळल्याचा हिंदू पक्षाचा दावा, फोटो समोर

ज्ञानवापी मशिदीत तीन दिवस चाललेले सर्वेक्षणाचे काम संपले आहे. (Gyanvapi Masjid Case) सोमवारी तिसऱ्या दिवशी सर्व्हेक्षण पथकाने नंदीच्या मूर्तीजवळील विहिरीची तपासणी केली. येथे शिवलिंग (Shivling) सापडल्याचा दावा हिंदू पक्षाच्या वकिलांनी केला.

पुढे वाचा ...
  वाराणसी, 17 मे : ज्ञानवापी मशिदीत तीन दिवस चाललेले सर्वेक्षणाचे (Gyanvapi Masjid Case) काम संपले आहे. सोमवारी तिसऱ्या दिवशी सर्वेक्षण पथकाने नंदीच्या मूर्तीजवळील विहिरीची तपासणी केली. येथे शिवलिंग (Shivling) सापडल्याचा दावा हिंदू पक्षाच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने आपल्या आदेशात शिवलिंगाभोवती फिरण्यास मनाई केली. वजूलाही येथे बंदी घालण्यात आली आहे. तसेच, ज्ञानवापीमध्ये आता केवळ 20 जणांना नमाज पठणाची माहिती देण्यात आली आहे. शिवलिंग असल्याचा दावा आले समोर - आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हिंदू पक्षाने असा दावा केला आहे की, ज्ञानव्यापी मशिदीतील विहिरीच्या आत शिवलिंग आहे. यानंतर वाराणसी न्यायालयाच्या आदेशानंतर आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे. पाहणीसाठी आलेल्या पथकाने पुरातन विहिरीच्या व्हिडीओग्राफीसाठी आत वॉटर प्रूफ कॅमेरा लावला होता. तीन दिवसांच्या पाहणीत ज्ञानवापी मशिदीच्या तळघरापासून ते घुमट आणि पश्चिमेकडील भिंतीपर्यंतचे व्हिडिओग्राफी करण्यात आली. आता हे पुरावे आज (मंगळवारी) न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत. 12 फूट 8 इंच शिवलिंग! हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी दावा केला की, ज्ञानवापीच्या वजुखानामध्ये 12 फूट 8 इंच आकाराचे शिवलिंग सापडले आहे. हे शिवलिंग नंदीजींच्या समोर आहे आणि सर्व पाणी काढून पाहिले गेले आहे. जे आत खोलवर आहे. शिवलिंग सापडताच लोकांनी हर हर महादेवचा जयघोष केला. ज्ञानवापी मशिदीतील बाबी कायदेशीर नोंदींमध्ये नोंदवले गेले आहे. तळघर ते घुमटापर्यंत व्हिडीओग्राफी करण्यात आली आहे. सर्वेक्षणाचे काम तीन फेऱ्यांत झाले. सोमवारी सर्वेक्षणाचा अंतिम दिवस होता. तीन दिवस चालले सर्वेक्षण -  मशिदीचे पहिले सर्वेक्षण हे 14 मे तर दुसरे सर्वेक्षण 15 मेला झाले. यानंतर तिसऱ्या दिवशी 2 तास सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण पथकाने नंदीजवळील विहिरीतून उर्वरित भागाची पाहणी केली. हिंदू पक्षाने शिवलिंग असल्याचा दावा केला आहे तर मुस्लिम पक्षाने काहीच नसल्याचा दावा केला आहे. हेही वाचा - Gyanvapi Masjid: 'हम दुसरी मस्जिद नहीं गवांना चाहते' - ओवैसींनी कोर्टाच्या निर्णयावर काय म्हटलंय, पाहा VIDEO
  सर्वेक्षणात सहभागी असलेल्या वकिलाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तीन खोल्यांमध्ये साप, कलश, घंटा, स्वस्तिक, संस्कृत श्लोक आणि हंस यांच्या मूर्ती सापडल्या असून, हा त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. मात्र, शिवलिंग मिळाल्याचा दावा मुस्लिमांकडून सातत्याने फेटाळला जात आहे. या सर्व दाव्यांमध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Court, Survey, Temple, Varanasi

  पुढील बातम्या