पश्चिम बंगालमधील डोमोहानी इथं आज संध्याकाळी ही घटना घडली. संबंधित ट्रेन बिहारच्या पाटणा इथून आसामच्या गुवाहाटी इथं जात असताना मैनागुडी इथं ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेप्रशासनासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना डब्यातून बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. (मोठी दुर्घटना ! पश्चिम बंगालमध्ये बिकानेर एक्सप्रेसचा अपघात) ही दुर्घटना आज संध्याकाळी जवळपास सव्वापाचच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भयानक होता की, प्रवाशांनी भरलेले चार डबे थेट जमिनीवर, तर एक डबा पाण्यात कोसळला. त्यातून एका प्रवाशाला बाहेर काढल्याचं वृत्त समोर आलं आहे. बिकानेर एक्स्प्रेसला परिसरातील आजूबाजच्या कोणत्याही रेल्वेस्थानकावर थांबा नव्हता. ट्रेन तिथून जात असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 30 ते 40 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. तसेच सिलिगुडी इथून एक रिलिफ ट्रेन पाठविण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर बंगालमधील मेडिकल कॉलेजला अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.पश्चिम बंगालमध्ये गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस घसरली pic.twitter.com/GXAnlyOLp9
— News18Lokmat (@News18lokmat) January 13, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.