• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • अरे बापरे, हा कशाचा प्रकाश? एलियन तर नाही? गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट, पाहा VIDEO

अरे बापरे, हा कशाचा प्रकाश? एलियन तर नाही? गुजरातचं आकाश अचानक उजळल्यानं घबराट, पाहा VIDEO

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

गुजरात (Gujrat) च्या जुनागड परिसरात आकाशात अचानक चमकणारी गोष्ट दिसल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. उडती तबकडी किंवा एलियन तर नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात आली. पण तज्ज्ञांनी कारण सांगितलं आहे.

 • Share this:
  अहमदाबाद, 23 जून : आकाशात उडणारा आणि प्रकाशकिरणं सोडणारा एक अज्ञात घटक (Unidentified Flying Object) किंवा उडती तबकडी (UFO in Gujarat sky) गुजरातच्या (Gujrat) आकाशात फिरत असल्याचं काही नागरिकांना दिसलं आणि पाहता पाहता देशभर याची चर्चा रंगली. गुजरातमधील जुनागढ परिसरात 21 जूनच्या रात्री आकाशात एक वस्तू दिसली, ज्यातून प्रकाशकिरण (Rays of lights) बाहेर पडत होते. अचानक हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली. गुजरातच्या विज्ञान मंडळानं (Gujrat council of science and technology) मात्र अशी कुठलीही अज्ञात वस्तू आकाशात फिरत असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पृथ्वीजवळून जाणारा एखादा उपग्रह कमी उंचीवर आल्यामुळे त्याचं दर्शन काही नागरिकांना झालेलं असू शकतं. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं किंवा घाबरण्यासारखं काहीच नसल्याचं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. परिसरातील नागरिकांनी काढले फोटो हे दृष्य पाहणाऱ्या काही नागरिकांनी फोटो काढून ते समाजमाध्यमांत अपलोड केले. या फोटोंमध्ये त्या अज्ञात घटकातून सात प्रकारचे प्रकाशकिरण बाहेर पडत असल्याचा दावा केला आहे. फेनिश लाडानी या व्यक्तीच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. दिव्येश त्रिवेदी यांनीही एक VIDEO Tweet केला आहे. एक अज्ञात घटक आपल्याला दिसला आणि 30 ते 40 प्रकारचे लाईट्स जमिनीवर पडल्याचं आपण पाहिलं, असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तीन शक्यता शास्त्रज्ञांनी आकाशात दिसलेला हा घटक म्हणजे काय असेल, याच्या तीन शक्यता वर्तवल्या आहेत. मांत्रिक बाबाने स्वप्नात वारंवार बलात्कार केला; महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस शॉक पहिलं म्हणजे ती उल्का असू शकते. दुसरं म्हणजे एखादा तुटलेला तारा असू शकतो किंवा एखादा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून पुढे निघून गेलेला असू शकतो. याव्यतिरिक्त इतर कुठलीही शक्यता नसून नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन शास्त्रज्ञांनी केलं आहे. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. मात्र सध्या समाजमाध्यमांमुळे त्याची अधिक चर्चा होत असल्याचं शास्त्रज्ञ सांगतात. आकाशात दिसणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काही ना काही खगोलशात्रीय कारण असतं. त्याचा शोध घेण्याचा नागरिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अवकाशात आपल्याला ज्ञात नसणारी वस्तू दिसली तरी घाबरून न जाता आणि गैरसमज न पसरवता योग्य ती शास्त्रीय माहिती घेण्याचं आवाहन शास्त्रज्ञांनी केलं आहे.
  Published by:desk news
  First published: