Home /News /national /

मांत्रिक बाबाने स्वप्नात येऊन वारंवार बलात्कार केला; महिलेच्या तक्रारीनंतर पोलीसही शॉक, कसा करणार निवाडा?

मांत्रिक बाबाने स्वप्नात येऊन वारंवार बलात्कार केला; महिलेच्या तक्रारीनंतर पोलीसही शॉक, कसा करणार निवाडा?

दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या बाबाला ताब्यात घेतलं.

    औरंगाबाद, 23 जून : मांत्रिक किंवा आध्यात्मिक बाबा असल्याचं भासवून महिलांवर बलात्कार झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना देशात घडल्या आहेत. अशा अनेकांना आतापर्यंत तुरुंगाची हवा खावी लागली आहे; पण बिहार (Bihar) राज्यातल्या औरंगाबादमध्ये (Aurangabad) नुकतीच या संदर्भातली एक विचित्र घटना समोर आली आहे. एका मांत्रिक बाबाने (Baba) आपल्या स्वप्नात येऊन आपल्यावर वारंवार बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार एका महिलेने पोलिसांत दाखल केली आहे. 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. संबंधित महिला कुदवां पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांधी मैदानाच्या (Gandhi Maidan) जवळ राहते. त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती जानेवारी महिन्यात संबंधित बाबाकडे गेली होती. आपल्या आजारी असलेल्या मुलावर उपचार करून घेण्याचा तिचा उद्देश होता. त्या वेळी त्या बाबाने काही तांत्रिक उपाय केले. तसंच 15 दिवसांचा पूजाविधी सांगून महिलेची बोळवण केली. त्यानंतर संबंधित बाबाने आपल्या स्वप्नात येऊन बलात्काराचा प्रयत्न केला, अशी तक्रार महिलेने दाखल केली आहे. त्या महिलेने सांगितलं, की 15 दिवसांनंतर आपल्या मुलाची तब्येत खूपच बिघडली आणि त्यातच त्याचं निधन झालं. त्याला वाचवणं शक्य झालं नाही. म्हणून ती महिला पुन्हा जेव्हा त्या बाबाकडे गेली, तेव्हा त्याने बलात्काराचा प्रयत्न केला, असं त्या महिलेचं म्हणणं आहे. महिलेने त्याला प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला; मात्र त्याने आपल्या दुसऱ्या मुलग्यालाही मंत्र-तंत्रांद्वारे मारण्याची धमकी आपल्याला दिली, असं महिलेचं म्हणणं आहे. हे ही वाचा-बसमध्ये प्रियकरासोबत संदिग्ध अवस्थेत तरुणी, अर्धनग्न अवस्थेत नेलं पोलीस ठाण्यात पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीनंतर संबंधित बाबाचा शोध घेतला. तो बाबा 20 वर्षांपासून कालीबाडी मंदिरात वास्तव्य करून असल्याची माहिती त्यांना मिळाली. मंदिराच्या आजूबाजूच्या लोकांच्या चौकशीत पोलिसांना अशी माहिती मिळाली, की तो बाबा मंत्र-तंत्रांचे उपाय वगैरे करत होता; मात्र कोणत्याही महिलेशी त्याने कधीही गैरवर्तन केलं नाही, असंही लोकांनी पोलिसांना सांगितलं. दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या बाबाला ताब्यात घेतलं. प्रशांत चतुर्वेदी (Prashant Chaturvedi) असं त्याचं नाव असल्याचं स्पष्ट झालं. त्या बाबाने संबंधित महिलेला ओळखलं नाही आणि तिला आपण कधीच पाहिलेलं नाही, असं त्याचं म्हणणं आहे. पोलिसांनी तपासाअंती एका बाँडवर त्या बाबाची सुटका केली. कारण त्यांना या प्रकरणात कोणीही साक्षीदार मिळाला नाही, तसंच त्याच्याविरोधात काही पुरावाही मिळाला नाही. त्यामुळे त्याला तूर्तास सोडून देण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे; मात्र संबंधित महिलेच्या अजब दाव्यामुळे औरंगाबाद शहरात सगळीकडे उलटसुलट चर्चेला तोंड फुटलं.
    First published:

    Tags: Bihar, Rape

    पुढील बातम्या