अहमदाबाद, 01 मे: महाराष्ट्रामध्ये भंडारा, भांडुप, नालासोपारा, नागपूर याठिकाणी रुग्णालयांना (Maharashtra Hospital Fire) लागलेल्या आगीच्या घटना ताज्या असतानाच आता गुजरातमधून (Gujrat Hospital Fire) देखील आगीची घटना समोर येते आहे. भरुच (Bharuch) याठिकाणी हे अग्नितांडव घडलं असून यात 16 जणांनी आपले प्राण (14 People Killed in Hospital Fire) गमावले आहेत.
गुजरातमधील भरुच याठिकाणी असणाऱ्या पटले वेलफेअप हॉस्पिटल (Patel Welfare Hospital) मध्ये रात्री बारा बाजण्याच्या सुमारास ही आगीची घटना घडली. याठिकाणी कोव्हिड सेंटर बनवण्यात आलं आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं होतं, त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी या घटनेमध्ये चौदा जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
Gujarat| Fire breaks out at a COVID-19 care centre in Bharuch. Affected patients are being shifted to nearby hospitals. Details awaited. pic.twitter.com/pq88J0eRXY
— ANI (@ANI) April 30, 2021
गुजरातमध्ये लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली आहे. भरुचचे एसपी राजेंद्र सिंह चुडासमा यांनी अशी माहिती दिली आहे की अतिदक्षता विभागात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं होतं. पण जोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलं जात होतं, तोपर्यंत बारा जणांनी आपले प्राण गमावले होते. त्यानंतर आणखी 4 जणांनी अखेरचा श्वास घेतला.
घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की, रुग्णालयाची तपासणी केली जात आहे. रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करत होत्या. दरम्यान या रुग्णालयात एकूण 58 रुग्ण भरती होते. मृतांमध्ये दोन नर्सचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Gujrat, Hospital Fire