जाहिरात
मराठी बातम्या / देश / अपघाताच्या तिसऱ्या दिवशी PM मोदी मोरबीमध्ये; आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अपडेट्स

अपघाताच्या तिसऱ्या दिवशी PM मोदी मोरबीमध्ये; आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अपडेट्स

अपघाताच्या तिसऱ्या दिवशी PM मोदी मोरबीमध्ये; आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अपडेट्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मोरबी येथे घटनास्थळी भेट दिली. पंतप्रधान मोदी येथे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मोरबी, 1 नोव्हेंबर : गुजरातमधील पूल दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोरबीला पोहोचले आहेत. ते येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींची प्रकृती जाणून घेत आहेत. तत्पूर्वी त्यांनी घटनास्थळी पोहोचून मच्छू नदीवरील तुटलेल्या पुलाची पाहणी केली. पंतप्रधान या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या मोरबी येथील पूल दुर्घटनेत आतापर्यंत 135 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी नौदल आणि एनडीआरएफच्या पथकांनी पुन्हा एकदा मच्छू नदीत मृतदेहांचा शोध सुरू केला आहे. गुजरातमध्ये बुधवारी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मोरबी दुर्घटनेचे मोठे अपडेट्स… एनडीआरएफच्या म्हणण्यानुसार आणखी 2 मृतदेह नदीत अडकले असण्याची शक्यता आहे. 125 जणांचे पथक आणि 12 बोटी असलेले गोताखोर शोध घेत आहेत. पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. यावर 14 नोव्हेंबरला कोर्टात सुनावणी होणार आहे.

जाहिरात

एनडीआरएफने सांगितले - आम्हाला संशय आहे की काही मृतदेह नदीच्या तळाशी असावेत. आम्ही गोताखोरांना बोलावून शोध मोहीम पुन्हा सुरू केली आहे.

पुलाची देखभाल करणाऱ्या ओरेवा कंपनीचे दोन व्यवस्थापक, पुलाची दुरुस्ती करणारे दोन कंत्राटदार, दोन तिकीट क्लर्क आणि तीन सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आली.

जाहिरात

अहमदाबादमधील अटल पुलासाठी अलर्ट जारी. 1 तासात फक्त 3,000 लोक इथे जाऊ शकतील. तो बनवणाऱ्या कंपनीने पुलाची क्षमता 12 हजार असल्याचा दावा केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat , pm modi
  • First Published :
जाहिरात
जाहिरात