जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / भारतात एक्झिट पोलसाठी लगीनघाई; पण, या देशांमध्ये आहेत कठोर कायदे

भारतात एक्झिट पोलसाठी लगीनघाई; पण, या देशांमध्ये आहेत कठोर कायदे

भारतात एक्झिट पोलसाठी लगीनघाई

भारतात एक्झिट पोलसाठी लगीनघाई

Assembly Election exit poll result 2022: हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 डिसेंबर : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांनंतर सायंकाळपासून टीव्ही चॅनेल आणि डिजिटल मीडियाच्या एक्झिट पोल च्या माध्यमातून या निवडणुकांमध्ये कोणता पक्ष जिंकतोय, कुठे वरचढ ठरतोय, याचा अंदाज बांधला जाईल. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोलबाबतचे नियम कडक केले आहेत. वास्तविक, असे अनेक देश आहेत जेथे एक्झिट पोलवर अंशतः किंवा पूर्णपणे बंदी आहे. काही वर्षांपूर्वी भारतात निवडणुकीच्या मधल्या टप्प्यात एक्झिट पोल प्रसारमाध्यमांद्वारे दाखविल्यानंतर तक्रारी येऊ लागल्या, तेव्हा निवडणूक आयोगाने नियम कडक केले. याअंतर्गत आता फक्त एक्झिट पोलचे प्रसारण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लोकसभा असो की विधानसभा सर्व निवडणुकींसाठी हा नियम लागू आहे. भारतातील एक्झिट पोलचा इतिहास 3 दशकांचा एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाच्या गाइडलाईन्स बरेच काही सांगतात. आपल्या देशातील एक्झिट पोलचा इतिहास 3 दशकांहून जुना नाही. भारतात खासगी वृत्तवाहिन्या सुरू झाल्यानंतर एक्झिट पोलसारख्या गोष्टीही समोर आल्या. वास्तविक, असे अंदाज अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये बऱ्याच काळापासून केले जात आहेत. अनेक देशांमध्ये एक्झिट पोलवर बंदी किंवा सशर्त परवानगी हे झालं भारताचं. पण, असे अनेक देश आहेत जिथे एक्झिट पोलवर एकतर बंदी घालण्यात आली आहे किंवा अतिशय कडक नियमांनी बांधले गेले आहेत. युरोपमध्ये 16 देश आहेत जेथे ओपिनियन पोलचा अहवाल देणे प्रतिबंधित आहे. हे निर्बंध निवडणुकीच्या 24 तास आधीपासून एक महिना आधीपर्यंत असतात. वाचा - राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार; त्याच दिवसापासून नव्या अभियानाची सुरुवात फ्रान्समध्ये काय नियम? फ्रान्समध्ये, मतदानाच्या दिवसाच्या 24 तास आधी, तुम्ही कोणत्याही प्रकारे निवडणुकीबद्दल मत नोंदवू शकत नाही. आधी ही बंदी फ्रान्समध्ये 7 दिवसांसाठी होती, ती 1977 पर्यंत देखील लागू होती. परंतु, नंतर न्यायालयाने ती 24 तासांपर्यंत मर्यादित केली. न्यायालयाने म्हटले की, 7 दिवसांची बंदी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. या देशांमध्ये ओपिनियन आणि एक्झिट पोलवर 7 दिवसांपूर्वी बंदी निवडणुकीच्या 7 दिवस आधी इटली, स्लोव्हाकिया आणि लक्झेंबर्गमध्ये कोणत्याही प्रकारचे ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोलवर बंदी आहे. यूकेमध्ये काय होतं? ब्रिटनमध्ये ओपिनियन पोलबाबत कोणतेही बंधन नसले तरी मतदान पूर्ण होईपर्यंत एक्झिट पोलचे निकाल देता येत नाहीत. अमेरिकेत मीडिया काय करते? अमेरिकेत ओपिनियन पोल केव्हाही दिले जाऊ शकतात. पण एक्झिट पोलचे निकाल निवडणुकीतील मतदान संपल्यानंतरच प्रसारमाध्यमांद्वारे दिले जातात. वाचा - Gujarat Elections 2022: गुजरात निवडणूक रंजक वळणार; सत्तेची चावी मात्र या समाजाच्या हाती जर्मनीमध्ये गुन्हा जर्मनीमध्ये निवडणुकीच्या मतदानापूर्वी एक्झिट पोल सुरू केल्यास तो गुन्हा मानला जातो.

News18लोकमत
News18लोकमत

बल्गेरियामध्ये कडक कायदे बल्गेरियामध्ये निवडणुकीच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल देणे बेकायदेशीर आहे. सिंगापूरमध्ये पूर्णपणे बंदी सिंगापूरमध्ये एक्झिट पोलवर पूर्णपणे बंदी आहे. तिथे कोणत्याही प्रकारे निवडणुकांवर प्रभाव टाकणे हा गुन्हा आहे, त्यामुळे त्याबाबत कमालीची कठोरता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात