Home /News /news /

परदेशातून परतणाऱ्या भारतीयांसाठी असणार 5 स्टार क्वारंटाईन कक्ष, पालिकेनं अशी केली तयारी

परदेशातून परतणाऱ्या भारतीयांसाठी असणार 5 स्टार क्वारंटाईन कक्ष, पालिकेनं अशी केली तयारी

वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    मुंबई, 07 मे : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधसाठी जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबईत विशेष विमानांनी परतणाऱ्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण (quarantine) केलं जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेनं एकूण 88 हॉटेलमध्ये मिळून 3343 कक्ष आरक्षित केले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात बहुतेक सर्व देशांनी लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना हवाई आणि जलमार्गे भारतात परत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दिनांक 7 मे 2020) पासून सुरू झालेल्या पहिल्या प्रयत्नात विविध 12 देशातून 64 विमान फेऱ्यांमधून एकूण 14,800 प्रवासी भारतात येणार आहेत. अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला, अवघ्या 12 तासांत सोडवला प्रश्न मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी मुंबईमध्ये एकूण 7 विमानांतून सुमारे 1900 नागरिक येतील. बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत परतणार आहेत. परतलेल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रारंभी अलगीकरण केलं जाणार आहे. अलगीकरण कालावधीत तपासणी केल्यानंतर कोरोना बाधा झालेली आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केलं जाईल. अलगीकरण करण्यासाठी मुंबईतील विविध 88 हॉटेलमध्ये एकूण 3343 कक्ष आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन/ तीन/ चार /पाच तारांकित तसेच वेगवेगळ्या हॉटेल्स सोबत अपार्टमेंट हॉटेल, ओयो बजेट हॉटेलचा देखील समावेश आहे. हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ, सलाईनमध्ये सापडलं शेवाळ संपादन- रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या