Home /News /national /

12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला शिक्षा, शाळेच्या मुख्याध्यापक ढसाढसा रडला कोर्टात

12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला शिक्षा, शाळेच्या मुख्याध्यापक ढसाढसा रडला कोर्टात

गेल्या काही वर्षांमध्ये शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

बिहार, 27 मे: महिला (Women) आणि मुलींशी (Girls) गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. सार्वजनिक ठिकाणं, कामाच्या कार्यालयांपासून तर अगदी स्वत:च्या घरात देखील महिला सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. इतकचं काय तर, अश्लील भाषा किंवा मीडिया फाईल्स पाठवून ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा महिलांचा छळ (Harassment) केला जातो. अशा असुरक्षित ठिकाणांमध्ये शाळा-महाविद्यालयांचाही (School-Colleges) समावेश होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शाळेतील शिक्षक (Teacher) आपले गुरू असल्यामुळे त्यांना आई-वडिलां इतकंच महत्त्व आणि आदर दिला जातो. मात्र, 2019 मध्ये बिहारमधील गोपालगंज (Gopalganj) शहरातील एका शिक्षकानं गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलं. त्याने शाळेतील 12 वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला (Teacher Raped Student) होता. विपिन साह असं या शिक्षकाचं नाव असून तो गोपालगंजमधील एका खासगी शाळेचा मुख्याध्यापक (Principal) होता. ही बाब उघडकीस येताच पीडित मुलीच्या आईने उचकागाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. आता कोर्टानं या प्रकरणाचा निकाल दिला असून आरोपीला 20 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा (Rigorous Imprisonment) सुनावण्यात आली आहे. एबीपी हिंदीनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटणारी टोळी पोलिसांच्या हाती, CCTV मुळे आरोपींची पोलखोल या प्रकरणातील पीडित मुलगी अल्पवयीन असल्यानं पोक्सो न्यायालयात (Pocso Court) हा खटला चालवण्यात आला. पोक्सो कायद्याचे अभ्यासक (Pocso Act) विशेष सरकारी वकील दरोगा सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, एडीजे-6 सह पॉक्सोच्या विशेष न्यायालयातील जज राजेंद्र कुमार पांडे यांनी दोषी मुख्याध्यापकाला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सोबत त्याला आर्थिक दंडही करण्यात आला आहे. शिक्षा सुनावल्यानंतर मुख्याध्यापक न्यायालयाच्या आवारातच ढसाढसा रडू लागला. आपण निर्दोष असल्याचं सांगत, आपली डीएनए चाचणी (DNA Test) झाली नसल्याचंही मुख्याध्यापक म्हणाला. 28 सप्टेंबर 2019 रोजी उचकागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. पीडित मुलगी सहाव्या वर्गात शिकत होती. शाळेच्या मुख्याध्यापकानं तिला बळजबरीने आपल्या चेंबरमध्ये बोलवून तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीने रडतरडत घरी पोहोचून पालकांकडे याबाबत तक्रार केली. पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर एफएसएल (FSL) पथकाने शाळेत जाऊन तपास केला असता ही घटना खरी असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी शाळा सील केली होती. बहिणीसोबतच्या रिलेशनशिपमुळे भडकला मुस्लिम बांधव, 25 वर्षीय तरुणाची केली हत्या जवळपास अडीच वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. कोर्टानं आरोपीला त्याच्या कृत्यासाठी शिक्षा ठोठावली आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Bihar, Court, Rape, Rape accussed, Sexual harassment, Student

पुढील बातम्या