मराठी बातम्या /बातम्या /देश /कोण आहेत पत्रकार इसुदान गढवी? ज्यांना AAP ने गुजरात निवडणुकीत बनवलंय CM पदाचा चेहरा

कोण आहेत पत्रकार इसुदान गढवी? ज्यांना AAP ने गुजरात निवडणुकीत बनवलंय CM पदाचा चेहरा

कोण आहेत पत्रकार इसुदान गढवी?

कोण आहेत पत्रकार इसुदान गढवी?

Gujarat Assembly Election 2022 Who is AAP CM Candidate: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने आपला मुख्यमंत्री चेहरा घोषित केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी सर्वेक्षण करताना इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अहमदाबाद, 4  नोव्हेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागताच भाजपसोबतच काँग्रेस आणि आम आदमी पक्षानेही मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ताकद लावली आहे. इसुदान गढवी यांना आम आदमी पक्षाने गुजरातचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. पक्षीय पातळीवर झालेल्या सर्वेक्षणात गढवी यांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली.

विशेष म्हणजे आम आदमी पक्ष गुजरात विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा दावा करत आहे. याबाबत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी जनतेची मते मागवली होती. यामध्ये 16 लाख 48 हजार 500 लोकांकडून सूचना प्राप्त झाल्या असून, यामध्ये 73 टक्के लोकांनी इसुदान गढवी यांचे नाव सुचवले आहे.

कोण आहे इसुदान गढवी?

पेशाने पत्रकार असलेले 40 वर्षीय इसुदान गढवी हे सध्या आम आदमी पक्षात राष्ट्रीय सहसचिव पदावर आहेत आणि गुजरातमधील पक्षाच्या मोठ्या चेहऱ्यांपैकी एक आहेत. राजकारणात येण्यापूर्वी गढवी हे गुजरातमधील सक्रिय पत्रकार होते. 2015 मध्ये, ते गुजराती मीडियाचा सर्वात तरुण चॅनल प्रमुख म्हणून VTV मध्ये जॉईन झाले. जिथे त्यांनी महामंथन नावाचा शो सुरू केला. या शोच्या माध्यमातून इसुदान यांनी गुजरातमधील लोकांच्या घराघरात पोहोचून आपली ओळख निर्माण केली.

जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावात जन्म, वडील शेतकरी

इसुदान गढवी यांनी पत्रकारिता सोडून 21 जून 2021 रोजी आम आदमी पक्षात प्रवेश केला. इसुदान यांचा जन्म 10 जानेवारी 1982 रोजी जामनगर जिल्ह्यातील पिपलिया गावात एका साध्या जहागीरदार कुटुंबात झाला. वडील खेराजभाई हे स्वतः शेतकरी असून संपूर्ण कुटुंबही शेतीशी निगडीत आहे.

वाचा - Video: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वत:वर मारले चाबकाचे फटके, पण का?

इसुदान हा गढवी जातीचा आहे, ज्याचा गुजरातमधील इतर मागास जातींमध्ये समावेश आहे. इसुदान हे आम आदमी पार्टीचे विद्यमान राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत. AAP मध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी टीव्ही पत्रकारितेची कारकीर्द सोडली आणि 14 जून 2021 रोजी राजकारणात प्रवेश केला. पत्रकार असताना, त्यांनी योजना नावाच्या लोकप्रिय दूरदर्शन शोमध्ये काम केले आणि नंतर त्यांच्या न्यूज शोमध्ये गुजरातमधील डांग आणि कपराडा तालुक्यातील अवैध जंगलतोडचा 150 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला.

इसुदान गढवी हे मागास जातीतील

इसुदान हे गढवी जातीचे आहेत, ज्यांचा गुजरातमधील इतर मागास जातींमध्ये समावेश आहे. इसुदान हे आम आदमी पार्टीचे विद्यमान राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत. AAP मध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी टीव्ही पत्रकारितेची कारकीर्द सोडली आणि 14 जून 2021 रोजी राजकारणात प्रवेश केला. पत्रकार असताना, त्यांनी योजना नावाच्या लोकप्रिय दूरदर्शन शोमध्ये काम केले. त्यांच्या न्यूज शोमध्ये गुजरातमधील डांग आणि कपराडा तालुक्यातील अवैध जंगलतोडीचा 150 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला होता.

गढवी स्वत:ला नायक सांगत लोकांना आशा आणि न्याय देण्याचे आश्वासन देत आहेत. त्यांनी न्यूज 18 ला सांगितले की, “माझ्या शोला लाखो प्रेक्षक होते. लोकांनी भरभरून प्रेम दिले आणि जेव्हा कार्यक्रम स्टुडिओबाहेर शिफ्ट केला गेला तेव्हा शेकडो लोक जमले असतील. विशेषत: शेतकऱ्यांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.”

First published:

Tags: AAP, Gujrat