मराठी बातम्या /बातम्या /देश /

Video : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वत:वर मारले चाबकाचे फटके, पण का?

Video : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वत:वर मारले चाबकाचे फटके, पण का?

राहुल गांधी यांनी तेलंगणातील बोनालू या उत्सवात भाग घेतला.

राहुल गांधी यांनी तेलंगणातील बोनालू या उत्सवात भाग घेतला.

राहुल गांधी यांनी तेलंगणातील बोनालू या उत्सवात भाग घेतला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Telangana, India
  • Published by:  News18 Desk

हैदराबाद, 3 नोव्हेंबर : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आज 57 वा दिवस आहे. त्यामुळे सध्या ही यात्रा तेलंगाणात आहे. भारत जोडो यात्रा ज्या ज्या ठिकाणांहून जात आहे. त्या त्या ठिकाणांहून त्यांना नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातच एक बातमी समोर आली आहे.

राहुल गांधीनी स्वत:ला मारले चाबकाचे फटके -

राहुल गांधी यांनी तेलंगणातील बोनालू या उत्सवात भाग घेतला. यावेळी त्यांनी या उत्सवाचा एक भाग म्हणून स्वत:वर चाबकाचे फटकेही मारले. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल माडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एक माणूस जाड काळ्या फटक्याने स्वतःला फटके मारताना दिसत आहे. त्यानंतर राहुल गांधी तेलंगणातील या स्थानिक परंपरेचा भाग म्हणून अक्षरशः स्वत:ला फटके मारताना दिसत आहेत. तसेच यावेळी त्याच्या आजूबाजूचा जमाव यावेळी जयजयकार करताना दिसत आहे.

अभिनेत्री पुजा भट्टही भारत जोडो यात्रेत सहभागी -

भारत जोडी यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून ते तेलंगणात पोहोचले आहे. 150 दिवसांच्या या प्रवासाची सांगता जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत चित्रपट अभिनेत्री आणि निर्माती पूजा भट्ट यांनीही या यात्रेला हजेरी लावली.

हेही वाचा - Nitin Raut : भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राच्या बड्या नेत्याला धक्काबुक्की, गंभीर जखमी

पुढच्या काही दिवसांत भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात 11 दिवस चालणार आहे. 7 नोव्हेंबरला ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे पोहोचणार आहे. देगलूरमध्ये ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचणार असून, यात्रेच्या सत्कारासाठी देगलूर नगरपरिषदेकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. यात्रेला सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत समाजसेविका मेधा पाटकरही सहभागी होणार आहेत. या यात्रेत वकील, डॉक्टर, सामाजिक संस्था, सांस्कृतिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

राहुल गांधी नांदेड जिल्ह्यात चार ठिकाणी मुक्काम करणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी रोज सभा व कॉर्नर सभा होणार आहेत. 10 नोव्हेंबरला नांदेड राहुल गांधी मोठ्या नेत्यांसह सर्वांची  बैठक घेणार आहेत. त्यानंतर नांदेड शहरातील देगलूर नाका येथून पदयात्रेला सुरुवात होईल, त्याच दिवशी नवीन मोंढा मैदानावर सभा देखील होणार आहे. यानंतर ते अकोला जिल्ह्यात पोहोचणार आहे. दररोज 24 ते 25 किलोमीटरची पदयात्रा होणार असून, यात्रेत महाराष्ट्रासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

First published:

Tags: Rahul gandhi, Telangana