मराठी बातम्या /बातम्या /देश /

पोलिसच असुरक्षित? हरियाणा, झारखंडपाठोपाठ आता केंद्रीय गृहमंत्र्याच्या राज्यात धक्कादायक घटना

पोलिसच असुरक्षित? हरियाणा, झारखंडपाठोपाठ आता केंद्रीय गृहमंत्र्याच्या राज्यात धक्कादायक घटना

गुजरातमधील बोरसद येथे पोलीस हवालदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अशी प्रकरणे नुकतीच हरियाणा आणि झारखंडमध्ये समोर आली होती. जिथं संशयास्पद वाहने रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.

  • Published by:  Rahul Punde

बोरसद, 20 जुलै : देशात घडणाऱ्या घटनांवरुन आता कायद्याचे रक्षकच संकटात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. राजरोसपणे पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यानंतर पोलीस सुरक्षित नसेल तर आमचं काय? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे. कालच हरियाणामध्ये डीएसपींना डंपरखाली चिरडून मारले होते. झारखंडमध्येही अशीच एक घटना समोर आली होती. या घटना ताज्या असतानाच आता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गुजरातमध्ये अशीच घटना घडली आहे. गुजरातमधील बोरसद येथे पोलीस हवालदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानहून आलेल्या एका संशयास्पद ट्रकने किरण राज या पोलीस कर्मचाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना चिरडले. त्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. उपचारादरम्यान पोलीस शिपाई किरण राज यांचा मृत्यू झाला.

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, आनंदचे डीएसपी अजित राय यांनी सांगितले की, ट्रकच्या चालकाची ओळख पटली आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे. अशी प्रकरणे नुकतीच हरियाणा आणि झारखंडमध्ये समोर आली होती. जिथं संशयास्पद वाहने रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. झारखंडमधील रांची येथे पोलिस उपनिरीक्षक संध्या टोपनो यांना एका संशयास्पद वाहनाने चिरडले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर हरियाणाच्या नूह जिल्ह्यात खाण माफियांच्या कारवायांवर लगाम घालत असताना डीएसपी सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला. खाण माफियांनी डीएसपी सुरेंद्र सिंह यांची डंपर खाली चिरडून हत्या केली.

खाण माफियांनी DSP च्या अंगावर थेट डंपर घातला अन्... 3 महिन्यांनी होणार होते निवृत्त

रांचीचे एसएसपी किशोर कौशल यांनी उपनिरीक्षक संध्या टोपनो यांच्या हत्येबाबत माहिती देताना सांगितले की, गुमला येथून येणारे एक संशयास्पद वाहन रांचीकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे उपनिरीक्षक संध्या टोपनो यांच्या नेतृत्वाखाली पोलीस चौकी तैनात करण्यात आली होती. उपनिरीक्षकाने वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना वाहनाने चिरडले. जखमी झाल्यानंतर संध्या टोपनो यांना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. एसएसपी किशोर कौशल यांनी सांगितले की, वाहन जप्त करण्यात आले असून चालकालाही अटक करण्यात आली आहे. त्या वाहनात आणखी एक व्यक्ती उपस्थित होती, त्याचा शोध सुरू आहे. लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

First published:

Tags: Attack on police, Gujrat