नवी दिल्ली, 19 एप्रिल : भारतीय नौसेनाला मोठं यश मिळालं आहे. भारतीय नौदलाने हजारो कोटी रुपयांपर्यंतच्या ड्रग्ज जप्त केल्या आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार अरब समुद्रात मासे पकडण्यासाठी जहाजात चढविण्यात येणारे 3 हजार कोटी रुपये अमली पदार्थ नौसेनाने जप्त केले आहे.
येथे अमली पदार्थ विरोधी एजन्सींनी आपल्या या अभियानाअंतर्गत भारत-पाकिस्तान सीमेजवळील अमली पदार्थ तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पकडलं आहे. याबाबत शनिवारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पाकिस्तानच्या लाहोरमधील खरक गावाचे निवासी 28 वर्षीय अमजद अली उर्फ माजिद जट्ट यांना सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी 6-7 एप्रिल रोजी रात्री फिरोजपूर जिल्ह्याचे खेमकरन सीमाक्षेत्रातून पकडलं होतं. यावेळी तो सहयोगींसह 20 किलो हेरोइन भारतातील त्याच्या संपर्कांत असणाऱ्या ग्राहकांना देणार होता.
हे ही वाचा-NCBकडून तिघांना अटक; 20 लाखांच्या रोकडसह ड्रग्जचा मोठा साठा जप्त
मिळालेल्या माहितीनुसार बीएसएफने अलीकडून 20.5 किलोग्राम हेरोइन, एक मोबाइल फोन, एक पॉवर बँक आणि 13 फूट लांब पीवीसी पाइप ताब्यात घेतलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उप महानिर्देशक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं की, हे अंतर-सीमा अमली पदार्थ तस्करी संबंधित प्रकरण आहे, त्यामुळे याचा तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपविण्यात येईल. ते पुढे म्हणाले की, हे एक आतंरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट आहेत, जे सीमेच्या पलीकडे काम करीत होतं. हे लोक समुद्राच्या दुसरीकडे आहेत आणि अमली पदार्थ भारतात पाठवत आहे. याबाबत भारत-पाक सीमेवर रात्री बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतलं असून त्याने गुन्हा कबुल केला असल्याचं सांगितलं जात आहे. मासेमारी करणाऱ्या जहाजातून ड्रग्सची तस्करी सुरू होती. नौसेना दलाने तब्बल 3000 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Drugs, Pak