मराठी बातम्या /बातम्या /देश /PM CARES Fund : रतन टाटा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, इन्फोसिसच्या सुधा मूर्तीही नव्या भूमिकेत

PM CARES Fund : रतन टाटा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, इन्फोसिसच्या सुधा मूर्तीही नव्या भूमिकेत

पंतप्रधान म्हणाले की, नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागाने पीएम केअर्स फंडाच्या कामकाजाला सर्वसमावेशक दृष्टिकोन मिळेल.

पंतप्रधान म्हणाले की, नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागाने पीएम केअर्स फंडाच्या कामकाजाला सर्वसमावेशक दृष्टिकोन मिळेल.

पंतप्रधान म्हणाले की, नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागाने पीएम केअर्स फंडाच्या कामकाजाला सर्वसमावेशक दृष्टिकोन मिळेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : भारतातील ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के.टी. थॉमस आणि लोकसभेचे माजी उपसभापती कारिया मुंडा यांना पीएम केअर्स फंडचे विश्वस्त (ट्रस्टी) बनवण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी "आपत्कालीन परिस्थितीत पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत निधी" म्हणजे "पीएम केअर्स फंड" च्या विश्वस्त मंडळासोबत बैठक घेतली होती. पीएमओच्या म्हणण्यानुसार, या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच नवनियुक्त विश्वस्त केटी थॉमस, रिया मुंडा आणि अध्यक्ष रतन टाटा उपस्थित होते.

सल्लागार मंडळात सुधा मूर्तींचा समावेश -

बैठकीत भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक राजीव महर्षी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती आणि इंडी कॉर्प्स आणि पिरामल फाऊंडेशनचे माजी कार्यकारी अधिकारी आनंद शाह यांना पीएम केअर्स फंडाच्या सल्लागार मंडळात नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पीएमओ दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान म्हणाले की, नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या सहभागाने पीएम केअर्स फंडाच्या कामकाजाला सर्वसमावेशक दृष्टिकोन मिळेल. "सार्वजनिक जीवनातील त्यांचा प्रचंड अनुभव हा निधी विविध सार्वजनिक गरजांसाठी अधिक प्रतिसाद देणारा बनवण्यासाठी अधिक चालना देईल," असेही ते म्हणाले.

कोविड काळात पीएम केअर्सने बजावलेल्या भूमिकेचे विश्वस्तांनी कौतुक केले, तर पंतप्रधानांनी पीएम केअर्समध्ये उदार योगदानाबद्दल देशवासीयांचे कौतुक केले. कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यानंतर, सरकारने कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन किंवा संकटाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पीएम केअर फंडची स्थापना केली होती.

हेही वाचा - मोदी सरकारचं मराठवाडा-विदर्भाला गिफ्ट, लॉजिस्टिक पार्कच्या ड्रीम प्रोजेक्टचा करार फायनल!

तर बैठकीदरम्यान, कोविड-19 मुळे आपले कुटुंब गमावलेल्या 4,345 मुलांना मदत करण्यासाठी "पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन" यासह पीएम केअरच्या मदतीने घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

First published:
top videos

    Tags: Pm narenda modi, Ratan tata, Tata group