Home /News /national /

भारताचा चीनी कंपन्यांना दणका, या कारणांमुळे रद्द केल्या Rapid Test Kitsच्या ऑर्डर्स

भारताचा चीनी कंपन्यांना दणका, या कारणांमुळे रद्द केल्या Rapid Test Kitsच्या ऑर्डर्स

संस्थेचा अभ्यास आणि या विषयांवर जगात प्रकाशित झालेले 13 रिपोर्ट्स यांचा आढाला घेऊन संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.

संस्थेचा अभ्यास आणि या विषयांवर जगात प्रकाशित झालेले 13 रिपोर्ट्स यांचा आढाला घेऊन संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.

245 रुपयांना एक या भावात या किट्स विकत घेण्यात आल्या होत्या. आणि वितरकांनी त्या सरकारला 600 रुपयांना एक या भावात विकल्याचं आढळून आलं होतं.

    नवी दिल्ली 27 एप्रिल: कोरोनाच्या उद्रेकानंतर चीन आणि चीनी कंपन्यांच्या व्यवहाराबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. जगातल्या अनेक देशांनी चीनवर माहिती दडपल्याचे आरोपही केले आहेत. असं वातावरण असतानाच भारताने चीनी कंपन्यांना चांगलाच दणका दिलाय. ICMR म्हणजेच Indian Council of Medical Researchने दोन चीनी कंपन्यांना दिलेल्या Rapid Test Kitsच्या ऑर्डर्स रद्द केल्याचं सोमवारी जाहीर केलं. या कंपन्यांच्या या किट्स या निकृष्ट दर्जाच्या आणि जास्त किंमतीच्या होत्या. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. 27 मार्चला केंद्र सरकारने ICMRच्या माध्यमातून चीनच्या दोन कंपन्यांना 5 लाख rapid antibody test kits च्या ऑर्डर्स दिल्या होत्या. या कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा किंमत लावल्याचा आरोप करत हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात गेलं होतं. या किट्सची पहिली खेप आल्यानंतर काही राज्यांमध्ये त्या पाठविण्यात आल्या होत्या. नंतर  ICMRच्या तपासणीत त्या किट्स या निकृष्ट दर्जाच्या असल्याचं आढळून आलं. त्यामुळे ICMRने सर्व राज्यांना या किट्सचा वापर करून नका असा सल्ला दिला होता. आता सगळ्या ऑर्डर्स रद्द करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांना सरकारने पैसे दिलेले नव्हते. त्यामुळे देशाचं एका पैशाचंही नुकसान झालं नाही असंही ICMRने म्हटलं आहे. 39 पत्नी, 94 मुलं तर 33 नातवंड!कोरोनामध्ये जगातील सर्वात मोठं कुटुंबं कसं राहतंय 245 रुपयांना एक या भावात या किट्स विकत घेण्यात आल्या होत्या. आणि वितरकांनी त्या सरकारला 600 रुपयांना एक या भावात विकल्याचं आढळून आलं होतं. दरम्यान,  कोरोना व्हायरसने सगळं जग हैरान आहे. 185 देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. बहुतांश देशांनी लॉकडाऊन केलं आहे. सगळे व्यवहार ठप्प आहेत. असं असताना ज्या देशातून कोरोना पसरला त्या चीनमध्ये मात्र आता सगळे व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून असलेली बंधनं हळू हळू दूर करण्यात येत आहेत. राजधानी बीजिंग आणि शांघाय सारख्या मोठ्या शहरांमध्ये काही शाळा आणि कॉलेजेस सुरू झाले आहेत. दुकानं आणि वाहतुकीलाही सुट देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून कोरोनाचे तुरळक रुग्ण सापडत आहे. जानेवारी महिन्यातच चीनमध्ये कोरोनाला सुरुवात झाली होती. त्यानंतर चीनने अतिशय कठोर निर्णय घेत लॉकडाऊन केलं. अनेक बंधणं लादली आणि कोरोनाला प्रसार रोखला. 'चीनकडून वाईट वागणूक मिळते', लोकांना मदत करणाऱ्या भारतीय पायलटनं सांगितलं दु:ख
    त्यानंतर हा आजार सर्व जगभर पसरला. आज 185 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. जगभरातल्या जवळपास 30 लाख लोकांना कोरोनाने ग्रासलं असून 2 लाख लोकांचा मृत्यू झालाय. चीनच्या भूमिकेमुळेच हा आजार जगभर पसरल्याचा आरोप होत आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या