मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Singer KK Passes Away: ''कायम आठवण ठेवू...'', Singer KK च्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचं Tweet

Singer KK Passes Away: ''कायम आठवण ठेवू...'', Singer KK च्या निधनानंतर पंतप्रधान मोदींचं Tweet

Singer KK Passes Away:  देशातील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ 'केके' यांच्या निधनाबद्दल (KK died) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे.

Singer KK Passes Away: देशातील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ 'केके' यांच्या निधनाबद्दल (KK died) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे.

Singer KK Passes Away: देशातील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ 'केके' यांच्या निधनाबद्दल (KK died) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे.

  • Published by:  Pooja Vichare
नवी दिल्ली, 01 जून: देशातील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ 'केके' यांच्या निधनाबद्दल (KK died) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती शोक व्यक्त करत त्यांनी ट्विट केलं आहे. केके या नावाने ते अधिक ओळखले जातात. ते फक्त 53 वर्षांचे होते. कोलकाता येथे एका कॉन्सर्टनंतर केके यांचे निधन झालं. त्यांना स्टेजवरच अस्वस्थ वाटत होते. कॉन्सर्टनंतर ते कोसळले आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सध्या बोलले जात आहे. प्रसिद्ध गायक केके यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केके नावाचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ यांच्या अकाली निधनाने मला दु:ख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या गाण्यांमध्ये विविध प्रकारच्या भावनांचे चित्रण होते, जे सर्व वयोगटातील लोकांशी जोडलेले होते. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती. केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे. केकेच्या चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कलकत्त्यातील गुरुदास कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये ते सादरीकरण करीत होते. यादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं सांगितलं जात आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी केकेंच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, ही बाब अद्यापही चाहत्यांना पचवणं कठीण झालं आहे. केके आपल्या जादुई आवाजासाठी प्रसिद्ध होता. bluetooth च्या जमान्यातल्या या गायकाने बऱ्याच सुपरहिट गाण्यांना प्ले-बॅक दिला आहे. हम रहे या ना रहे कल... पल याद आयेंगे पल या त्यानेच गायलेल्या गाण्याच्या ओळी आज लागू पडत आहेत. त्याच्या शेवटच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ त्याच्या फॅन्सनी शेअर केले आहेत. लाईव्ह कॉन्सर्टमधून हॉस्पिटलमध्ये नेतानाचा KK चा Video समोर  केके याने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहे. तडव तडप के, खुदा जाने, अजब सी, तूही मेरा शह है पासून देसी बाॅइज, तसं बहाने… अशा पाॅप कल्चरला जवळ जाणाऱ्या अनेक प्रकारच्या गाण्यांना केकेचा आवाज होता. हिंदीशिवाय मराठी, गुजरातील, मल्याळम, बंगाली, तेलुगू, तामिळ, कन्नड गाण्यांनाही त्याने आपला आवाज दिला. फिल्मसाठी गाणी गाण्यापूर्वी त्याने जवळपास 35000 जिंगल्स गायले आहेत. 1999 सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय टीमसाठी त्याने 'जोश ऑफ इंडिया' गाणं गायलं. पल या म्युझिक अल्बममधून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली.
First published:

Tags: Entertainment

पुढील बातम्या