जाहिरात
मराठी बातम्या / देश / Good News : यंदा मान्सूनचा प्रवास वेळेत, अखेर Monsoon अंदमानात दाखल

Good News : यंदा मान्सूनचा प्रवास वेळेत, अखेर Monsoon अंदमानात दाखल

Good News : यंदा मान्सूनचा प्रवास वेळेत, अखेर Monsoon अंदमानात दाखल

येत्या 20 दिवसात मान्सून तळकोकणार बरसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मे : भारताच्या पश्चिम किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) धडकल्यानंतर आता नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वीच हवामान विभागाने 21 मे रोजी अंदमानात मान्सून (Monsoon) धडकणार असल्याचं अंदाज वर्तवला होता. त्यामुसार मान्सून वेळेत अंदमानात दाखलझाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. (Monsoon arrives in Andaman) हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 21 जूनला नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचले असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे निकोबार बेट, बंगालचा उपसागर, संपूर्ण अंदमान आणि उत्तर अंदामानाच्या काही भागात मान्सूनचा परिणाम दिसून येत आहे. पुढील 48 तास हा परिणाम दिसून येईल, असेही सांगितले जात आहे. (Monsoon arrives in Andaman) हे ही वाचा- VIDEO : महाभयंकर तौत्के चक्रीवादळाचा प्रवास आणि लँडफॉल कसा होता? केरळात कधी दाखल होणार मान्सून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार आहे. सध्या मान्सूनसाठी वातावरण पोषक आहे. परिणामी जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ, त्यानंतर 10 जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होऊ शकतो. त्यानंतर 15 ते 20 जूनदरम्यान उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात