जाहिरात
मराठी बातम्या / देश / GOOD NEWS : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले दुप्पट; हॉटस्पॉटबाबतही केला मोठा खुलासा

GOOD NEWS : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले दुप्पट; हॉटस्पॉटबाबतही केला मोठा खुलासा

GOOD NEWS : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले दुप्पट; हॉटस्पॉटबाबतही केला मोठा खुलासा

गेल्या 10 दिवसात देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून ही बाब सर्वांसाठी समाधानकारक आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 एप्रिल : देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची माहिती आज आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील अनेक भागांमध्ये हॉटस्पॉट (Hotspot) लागू करण्यात आले आहे. या भागांमध्ये लॉकडाऊनचे नियम कडक केले आहे. सरकारने वेळोवेळी याबाबत उपाययोजना केल्याने या भागांमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी यंत्रणेला यश येत आहे. आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार केलेल्या उपाययोजनांमुळे हॉटस्पॉट्स जिल्हे आता बिगर हॉटस्पॉट्समध्ये बदलत आहेत. ही सकारात्मक बाब आहे.

जाहिरात

सध्या देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 21.90 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे जिल्हे बिगर हॉटस्पॉट होत आहेत. गेल्या 10 दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. साधारण हे प्रमाण 12 टक्के (16 एप्रिल) आणि 22 टक्के हे आतापर्यंत आहे. ही आकडेवारी समाधानकारक आहे. आतापर्यंत 6,25,309 रुग्णांची तपासणी केल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले. नव्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 47 जणांचा मृत्यू झाला असून 704 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1975 नवे रुग्ण दाखल करण्यात आली असून देशात एकूण रुग्णसंख्या 26917 पर्यंत पोहोचली आहे आणि आतापर्यंत देशात एकूण मृतांचा आकडा 826 पर्यंत पोहोचला आहे. (सायंकाळी 6 वाजेपर्यंत) एकूण रुग्णसंख्या - 26917 एकूण मृतांचा आकडा - 826 संबंधित - देशाला हादरवणारं हत्याकांड, सूनेनच कुटुंबाला विष देऊन संपवल; पोलिसांचा दावा कोरोना योद्धा : कॅन्सर शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवसापर्यंत IPS अधिकारी ड्यूटीवर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात