नवी दिल्ली, 17 जुलै : गेल्या काही वर्षात प्रेमसंबंधांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आता बदलला आहे. पूर्वी जिथे प्रेमप्रकरणांवर नुसत्या गप्पा मारल्या जायच्या तिथे आता अशी प्रेमप्रकरण कॉलेज, ऑफिसमध्ये सर्रास घडू लागली आहेत. शहरीभागांमध्ये आता ऑनलाईन डेटिंग हे सामान्य झाले आहे. आता अशा अनेक वेबसाइट्स देखील आल्या आहेत ज्याचा वापर विवाहित लोक स्वतःसाठी दुसरा जोडीदार शोधण्याकरता करू शकतात. ‘ग्लीडेन’ हे एक विवाहबाह्य डेटिंग अॅप असून 2017 मध्ये हे अॅप भारतात लाँच झाले होते. तसेच देशात या अॅपचे 2 दशलक्षाहून अधिक सदस्य आहेत. ग्लीडन यांनी काही काळापूर्वी एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात सुमारे 4000 लोकांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी 37 टक्के लोकांनी सांगितले की ते एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतानाही त्या व्यक्तीला फसवू शकतात. सर्वेक्षणात विवाहबाह्य संबंधांना दुजोरा देणाऱ्यांमध्ये 59 टक्के पुरुष आणि 53 टक्के महिला होत्या.
सर्वेक्षणात सामील झालेल्या 49 टक्के पुरुष आणि 60 टक्के महिला या नॉन मोनोगैमस रिलेशनशिपमध्ये होते. सर्वेक्षणातील हे स्त्री पुरुष एकाहून अधिक रिलेशनशिपमध्ये राहिले होते. 63 टक्के लोक त्यांच्या वैवाहिक जीवनाला कंटाळून विवाहबाह्य संबंधांकडे वळू इच्छितात. तर 20 टक्के लोकांचं म्हणणं आहे की एका पेक्षा जास्त पार्टनर असण्याला आता सामान्य करायला हवं. 10 टक्के लोकांनी जोडीदारासोबतच्या मतभेदाचे कारण सांगितले, तर 8 टक्के लोकांनी दुसऱ्यासोबत प्रेम असल्याचे कारण सांगितले. मोनोगॅमी म्हणजे एकाच वेळी फक्त एका जोडीदारासोबत राहणे किंवा पॉलिमरी म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त जोडीदारासोबत राहणे. ही कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक निवड असू शकते, दोन्ही प्रकारच्या संबंधांमध्ये स्पष्टता आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. डेटिंग अॅप बनवणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे की, हे विवाहित लोकांसाठी डेटिंग अॅप आहे. कंपनी म्हणते की ती आपल्या वापरकर्त्यांना संपूर्ण सुरक्षा देते, चांगल्या दर्जाची सेवा देते, त्यांची ओळख लपवते आणि स्वातंत्र्य देते. परंतु गुगल प्ले स्टोअरवरील या अॅपचे रेव्हूज काही वेगळेच सांगतात. याअॅपला गुगलवर प्ले स्टोरवर 3.5 स्टार रेटिंग मिळाली आहे. गटारीचं सेलिब्रेशन जीवावर बेतलं, दोन भावांचा धक्कादायक शेवट या अॅपमध्ये एखाद्याशी संभाषण सुरू करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. एका यूजरने लिहिले की, हे अॅप पैसे कमवण्यासाठी बनवण्यात आले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, अनेक वेळा दृच्छिक प्रोफाइलवरून संदेश येतात. जेव्हा तुम्ही त्या संदेशांना उत्तर देता तेव्हा तुमचे पैसे कापले जातात, परंतु त्या प्रोफाइलमधून पुन्हा संदेश येत नाही. त्याचप्रमाणे काही युजर्सनी याला स्कॅम अॅप असेही म्हटले आहे. यासोबतच अनेक यूजर्सनी फेक प्रोफाईलबाबतही तक्रारी केल्या आहेत. म्हणाले की, या अॅपमध्ये तुमच्याशी बोलत असलेली व्यक्ती खरी आहे की नाही हे समजत नाही. त्याचप्रमाणे काही वापरकर्त्यांनी याचा युझर इंटरफेसच वेगळा आहे असे म्हंटले आहे.