दानापूर, 4 जुलै : बिहारची राजधानी पाटणाला (Patna) लागून असलेल्या दानापूरमध्ये (Danapur) अजब प्रेमाची गजब गोष्ट समोर आली आहे. प्रेमीयुगुल (Couple) लग्न करण्याच्या इराद्याने घरातून पळून जात होते. हा प्रकार मुलीच्या आईला कळताच तिने त्यांच्या मागे जाऊन काही अंतर गेल्यावर दोघांना पकडले. यावेळी मैत्रिणीची आई जोरात आरडाओरड करू लागली, त्यामुळे घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. प्रकरण समजल्यावर, प्रेमी युगुलाला त्यांची इच्छा जागीच विचारण्यात आली, त्यानंतर दोघांनी जाहीरपणे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय तर गावकऱ्यांनी जवळच असलेल्या मंदिरात त्याचे लग्न लावून दिले. यावेळी मुलीची आईही लग्नाची साक्षीदार बनली. संपूर्ण परिसरात या लग्नाची चर्चा होत आहे. ही प्रेमकथा चित्रपटांपेक्षा वेगळी आहे. बॉयफ्रेंड अनिल कुमार आणि गर्लफ्रेंड इंदू कुमारी एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात भेटले होते. लग्नाच्या कार्यक्रमात दोघांची ओळख झाली आणि यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दुसरीकडे, प्रियकर आणि प्रेयसीच्या कुटुंबीयांचा या नात्याला नकार होता. दोघांनी लग्न करावे, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे लग्न करण्याच्या इराद्याने अनिल त्याच्या मैत्रिणीला सोबत घेऊन परदेशात जाऊ लागला. हे पाहून मुलीची आई त्यांच्यामागे लागली. प्रेयसीची आई खिरीमोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोडिहारा गावातून मैरी बिघा या दुसऱ्या गावात त्यांच्यामागे गेली. यानंतर इंदूच्या आईने दोघांनाही पकडून आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थ तेथे जमा झाले होते. ग्रामस्थांनी अनिल आणि इंदूला पकडले. या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर त्यांनीत्या दोघांकडून त्यांची इच्छा जाणून घेतली. तर अनिल आणि इंदूने एकमेकांशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांनीही होकार दिल्यावर गावकऱ्यांनी गावातील मंदिरात आणून मातृदेवतेला साक्षी ठेवून पारंपारिक रीतीरिवाजांनी त्यांचे लग्न लावून दिले. हेही वाचा - तीन मुलींची आई गेली प्रियकरासोबत राहायला, पतीने गावकऱ्यांसोबत मिळून केलं किळसवाणं कृत्य लग्नानंतर दोघांनाही गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात निरोप दिला. प्रियकर अनिल हा अरवाल जिल्ह्यातील करपी पोलीस ठाण्यांतर्गत बेलखेडा गावातील रहिवासी सत्येंद्र पंडित यांचा मुलगा आहे. तर त्याची गर्लफ्रेंड इंदू ही पाटणा जिल्ह्यातील खेरीमोड पोलीस स्टेशन क्षेत्रातील कोडी हारा गावातील रहिवासी योगेंद्र पंडित यांची मुलगी आहे. हे लग्न संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.