पोलिसांसमोर भरभर इंग्रजी बोलायला लागला भिकारी, शिक्षण विचारल्यावर लिस्ट संपेना

पोलिसांसमोर भरभर इंग्रजी बोलायला लागला भिकारी, शिक्षण विचारल्यावर लिस्ट संपेना

वाढत्या बेरोजगारीमुळे रस्त्यावर भिक मागण्याचा घेतला निर्णय.

  • Share this:

पुरी, 19 जानेवारी: वाढती स्पर्धा आणि बेरोजगारीमुळे देशभरातून तरुणांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. भुवनेश्वर इथल्या जयदेव विहार परिसरात एका उच्च शिक्षित तरुणाला  भीक मागायची वेळ आली आहे. हा तरुण उच्च शिक्षण घेऊनही  भीक मागायची वेळ वाढत्या बेरोजगारीनं आल्याचा त्याचा दावा आहे. या तरुणाला भीक मागायची वेळ का आली? तो उच्च शिक्षित आहे याचा उलगडा कसा झाला नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.

भुवनेश्वर इथे रस्त्याच्याकडेला बसलेल्या तरुणाला रिक्षा चालकानं जोरदार धक्का मारला. यामध्ये हा तरुण जखमी झाला. रिक्षा चालकासोबत झालेल्या वादानंतर तरुणानं पोलीस स्थानक गाठलं. या तरुणाचं नाव गिरीजा शंकर मिश्रा असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी घडलेला सर्व प्रकार पोलिसांच्या कानावर घातला आणि रिक्षा चालकाविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे मिश्राने सगळी घटना पोलिसांना इंग्रजीमध्ये सांगितली. त्याची अवस्था पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण बी-टेक झालेला होता. प्लास्टिक इंजिनियरिंग कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. काही काळ गेस्ट लेक्चर म्हणून पोटापाण्यासाठी काम करत होता. त्यानंतर मिल्टन कंपनीमध्येही त्याने नोकरी केली असंही सांगितलं जात आहे. मात्र कंपनीतून त्याची नोकरी गेल्यानंतर मात्र त्याने रस्त्यावर  भीक मागण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार वाढत असलेली बेरोजगारी आणि अपुऱ्या नोकऱ्यांमुळे या तरुणाचे हे हाल झाल्याचं म्हणणं आहे.

हेही वाचा-शबाना आझमींच्या अपघातानंतर लोक का करतायत या सैनिकाला सलाम?

हेही वाचा-परीक्षेत मुन्नाभाई स्टाईल करायला गेला आणि फसला, पोलिसांकडून 4 जणांना अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 02:53 PM IST

ताज्या बातम्या