• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • गुलाम नबी आझादांचं मोठं विधान; म्हणाले, कलम 370 भाजपच रद्द करणार माहिती होतं, पण..

गुलाम नबी आझादांचं मोठं विधान; म्हणाले, कलम 370 भाजपच रद्द करणार माहिती होतं, पण..

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad)यांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आझाद म्हणाले, की जेव्हा केव्हा जम्मू काश्मीरमधून कलम 370 (Article 370) रद्द केलं जाईल तेव्हा सरकार भाजपचंच (BJP) असेल हे मला माहिती होतं.

 • Share this:
  नवी दिल्ली 14 फेब्रुवारी : राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलेल्या कौतुकानंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad)यांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आझाद म्हणाले, की जेव्हा केव्हा जम्मू काश्मीरमधून कलम 370 (Article 370) रद्द केलं जाईल तेव्हा सरकार भाजपचंच (BJP) असेल हे मला माहिती होतं. मात्र, हे सगळं इतक्या लवकर होईल, असं वाटलं नव्हतं. ते म्हणाले, की कलम 370 हटवण्यासारखा मोठा निर्णय मोदी सरकार घेईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. काँग्रेस नेता म्हणाले, की जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर मीदेखील हैराण होतो. मी कधीच असा विचार केला नव्हता, की जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं जाईल. ते म्हणाले, की मोदी सरकारनं एका राज्याला कमीपणा दाखवण्यासाठी हे सगळं केलं आहे. जोपर्यंत जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जाणार नाही. तोपर्यंत राजकीय अस्थिरता कायम राहिल, असा दावाही त्यांनी केला. तर काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल बोलताना आझाद म्हणाले, की जर काँग्रेसचा अध्यक्ष गांधी परिवाराशिवाय इतर एखाद्या नेत्याला बनवलं तरी मोठा काही फरक पडणार नाही. ते म्हणाले, की जेव्हापर्यंत प्रत्येक पातळीवर पक्षाला मजबूत केलं जात नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. राज्यसभेत आझाद यांना निरोप देताना पंतप्रधानांचे डोळे पाणावले होते. याबद्दल सवाल केला असता, आझाद म्हणाले की याचा संबंध एका घटनेसोबत आहे.ते म्हणाले, की जेव्हा पंतप्रधानांच्या डोळ्यात पाणी आलं त्यानंतर मीदेखील रडलो. त्यांनी ज्या घटनेचा उल्लेख केला होता, त्याबद्दल विचार करताच डोळ्यात पाणी येतं. मी गुजरातच्या पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याची माहिती तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रडत रडतच दिली होती.
  Published by:Kiran Pharate
  First published: