नवी दिल्ली, 26 मार्च: सिनेमात शोभेल असा गँगस्टर ते नेता असा प्रवास करण्याऱ्या मुख्तार अन्सारीच्या (Mukhtar Ansari) पायाखालची वाळू सरकली आहे. पंजाबच्या तुरुंगातून उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात हलवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अन्सारींना उत्तर प्रदेशात हलवण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून मुख्तार अन्सारीचा ताबा मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील होतं. मात्र पंजाब सरकारने मुख्तार अन्सारीच्या तब्येतीचं कारण पुढे करत उत्तर प्रदेशात रवानगी करण्यास मनाई केली होती.
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं (Yogi adityanath) सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता दोन आठवड्यांसाठी मुख्तार अन्सारीला उत्तर प्रदेश सरकारच्या स्वाधीन करावं लागणार आहे.
मुख्तार अन्सारी विरोधात उत्तर प्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाची सुनावणी दिवाणी, सत्र न्यायालयात सुरु आहे. मात्र आरोपी अन्सारीला पंजाबमधून उत्तर प्रदेशातील न्यायालयात आणणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार मुख्तार अन्सारीचा ताबा मागत होतं. जानेवारी 2019पासून पंजाबमधील तुरुंगात बंदिस्त आहे.
देशातील कोरोनामुळे सरकारनं उचललं पाऊल, गृह मंत्रालयाचे राज्यांना निर्देश
जीवाला धोका असल्याचं कारण पुढे करत मुख्तार अन्सारीने कोर्टात दाद मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने मागणी फेटाळून लावत मुख्तारी अंसारी ताबा दोन आठवड्यांसाठी उत्तर प्रदेश सरकारकडे देण्याचे आदेश दिले आहेत. मुख्तार अंसारी विरोधात उत्तर प्रदेशात अनेक गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे पंजाबच्या रोपड तुरुंगातून गाजीपूर तुरुंगात शिफ्ट करण्याची मागणी उत्तर प्रदेश पोलिसांनी सुप्रीम कोर्टात केली होती.
उत्तर प्रदेशातील डॉन मुख्तार अन्सारी पंजाब तुरुंगात कसा?
मुख्तार अन्सारीने पंजाबमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटीची खंडणी मागितली होती. दोन वर्षांपूर्वी प्रॉडक्शन वॉरंट जारी करत त्याला मोहालीला आणलं होतं. 24 जानेवारी 2019 मध्ये न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत मुख्तार अन्सारी पंजाबच्या रोपड तुरुंगात बंद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: UP Goverment, Yogi Aadityanath