मुंबई : १० दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पाला निरोप देताना डोळ्यात अश्रू होते. अखेर बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देताना एक चूक महागात पडली. देशात आतापर्यंत विसर्जनादरम्यान १५ लोकांनी जीव गमवला आहे. बाप्पाला निरोप देताना ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दुर्दैवी घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये विसर्जनाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेत 15 जणांनी जीव गमवला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हरियाणातील महेंद्रगढ येथील झगरोली कालव्यात गणेशमूर्तीसह आठ जण वाहून गेले, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, सोनीपतमध्ये यमुना नदीत बुडून 2 जणांचा मृत्यू झाला, तर 2 अद्याप बेपत्ता आहेत.
गणपति विसर्जन के दौरान हुए कई हादसे, अलग-अलग स्थानों पर डूबने से कई लोगों की मौत #GaneshVisarjan #GaneshIdolImmersionCeremony #Drown @jaspreet_k5 pic.twitter.com/7ITrJ701bf
— News18 India (@News18India) September 10, 2022
उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. संत कबीर नगर येथील आमी नदीत गणपती विसर्जन करताना 4 मुलांचा बुडून मृत्यू, चौघेही भाऊ-बहीण होते. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ललितपूर आणि उन्नावमध्ये विसर्जनाच्या वेळी बुडून २-२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील पनवेलमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी जनरेटर मशिनची तार तुटल्याने 11 जणांचा विजेचा शॉक लागला. त्यापैकी एकाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. पनवेलमधील वडघर परिसरात विसर्जनाच्या वेळी ही घटना घडली.