जाहिरात
मराठी बातम्या / देश / एकीकडे राममंदिरासाठी निधी संकलन; दुसरीकडे मशिदीच्या पायाभरणीचा दिवस ठरला!

एकीकडे राममंदिरासाठी निधी संकलन; दुसरीकडे मशिदीच्या पायाभरणीचा दिवस ठरला!

एकीकडे राममंदिरासाठी निधी संकलन; दुसरीकडे मशिदीच्या पायाभरणीचा दिवस ठरला!

जगातील सर्वात वेगळ्या मॉडर्न डिजाइनच्या या मशिदीचं डिजाईन जामिला मिलाया इस्लामिक यूनिवर्सिटीच्या आर्किटेक्ट प्रोफेसर एमएस अख्तर यांनी तयार केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 18 जानेवारी : सध्या देशभरात अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी जमा केला जात असताना अयोध्येत मशिदीची पायाभरणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील तयारी पूर्ण झाली असून 26 जानेवारी रोजी मशिदीची पायाभरणी केली जाणार आहे. अयोध्येतील धनीपूरात मशिदीची पायाभरणी केली जाणार आहे. जुफर अहमद फारुखी यांच्यासह सर्व ट्रस्टी यावेळी सहभागी होतील. जुफर फारुखी हे इंडो इस्लामिक कल्चर फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. 26 जानेवारी रोजी झेंडावंदन केल्यानंतर मशिदीची पायाभरणी केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. अयोध्येतील धन्नीपूर गावात (Dhannipur Masjid) 5 एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीची डिजाईन सर्वांच्या समोर आली आहे. सांगितलं जात आहे की, या मशिदीत एकाच वेळी 2 हजार लोक नमाज पठण करू शकतील. हे ही वाचा- होणाऱ्या बायकोसाठी केली 6 लाखांची Shopping; नवरदेवाला चुना लावून फरार संपूर्ण मशिदीला सोलर लाइटने पॉवर सप्लाय होणार आहे. जगातील सर्वात वेगळ्या मॉडर्न डिजाइनच्या या मशिदीचं डिजाईन जामिला मिलाया इस्लामिक यूनिवर्सिटीच्या आर्किटेक्ट प्रोफेसर एमएस अख्तर यांनी तयार केलं आहे. ही माहिती मशिदीची ट्रस्ट इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे सचिव अतहर हुसैन यांनी दिली आहे. दुसरीकडे अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कार्याला आता गती मिळाली आहे. अयोध्येतील राम मंदिर लोक सहभागातूनच उभारण्यात येणार आहे. राम मंदिरांच्या देगणीसाठी 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभर अभियान राबवण्यात येणार आहे. 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभरात राम मंदिरासाठी देणगी अभियान राबवण्यात येणार आहेत. त्यात दीड लाख स्वयंसेवक सहभागी होणार असून 1000 , 100, 10 रुपयांची कुपन्स देणार आहेत. शिवाय जे देणगीदार 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देईल, त्यांना पावती देण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात