नवी दिल्ली 30 एप्रिल : जगभरात अजूनही कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर कायम आहे. कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोना विषाणूच्या चौथ्या लाटेनं (Fourth Wave) आशिया आणि युरोपीय देशांमध्ये कहर केला आहे. भारतातही स्थिती काही निराळी नाही. देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे. रोज 2000 हून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. यावेळी ओमिक्रॉन (Omicron) आणि त्याचे सब व्हॅरिएंट्स (Sub variant) सर्वात धोकादायक ठरत असल्याचं सिद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार लस (Vaccine) घेतलेल्या नागरिकांनादेखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसून आलं आहे. बापरे! पहिल्या लॉकडाऊनदरम्यान देशातल्या 85 हजारांहून अधिक जणांना एचआयव्हीची लागण, महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित कोरोनानं गेल्या दोन वर्षांपासून जगाला वेठीस धरलं आहे. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये, यासाठी अनेक देशांमध्ये सातत्याने निर्बंध किंवा लॉकडाउन लागू करण्यात येत आहेत. कोरोनाचे आतापर्यंत अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ओमिक्रॉन आदी व्हॅरिएंट्स आढळून आले आहेत. त्यापैकी ओमिक्रॉन हा व्हॅरिएंट सर्वांत जास्त वेगानं पसरत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. सध्या चीनमध्ये (China) कोरोनामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनमधल्या अनेक प्रांतांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अन्य देशांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना तज्ज्ञांनी दिल्या आहेत. भारतातल्या (India) काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या बघता अनेक राज्यांनी निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये मास्क (Mask) वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन आणि त्याच्या सब व्हॅरिएंटपासून सावध राहणं गरजेचं झालं आहे. Covid-19 New Symptom: Corona च्या लक्षणांमध्ये आणखी एकाची भर, ‘या’ नव्या लक्षणानं वाढवलं टेन्शन सध्या कोरोना विषाणूचे नवे व्हॅरिएंट आढळून येत आहेत. लस घेतलेल्या नागरिकांनादेखील या व्हॅरिएंटमुळे संसर्ग होत आहे. 17 जानेवारी ते 21 ऑगस्ट 2021 दरम्यान लस घेतलेल्या दर 5000 पैकी एकाला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आल्याचं वॉशिंग्टन स्टेटमधल्या एका अभ्यासात म्हटलं आहे. लशीचे सर्व डोस घेतलेल्या 100 नागरिकांपैकी एक व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचं दिसून आलं आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे. श्वसन आणि शिंकेद्वारे कोरोनाचा संसर्ग फैलावतो, असं जॉन हॉपकिन्सच्या एका अहवालात म्हटलं आहे. यूरोसर्व्हिलन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, लशीचे सर्व डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची काही प्रमुख लक्षणं आढळून आली आहेत. यात खोकला, नाक वाहणं, घशात खवखव, डोकेदुखी, स्नायू दुखणं आणि ताप या लक्षणांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.