मराठी बातम्या /बातम्या /देश /दहशतीच्या राजकारणाचा चेहरा ! दोघा भावांना अ‍ॅसिड टाकून जिवंत जाळणाऱ्या मोहम्मद शहाबुद्दीनची थरकाप उडवणारी कथा

दहशतीच्या राजकारणाचा चेहरा ! दोघा भावांना अ‍ॅसिड टाकून जिवंत जाळणाऱ्या मोहम्मद शहाबुद्दीनची थरकाप उडवणारी कथा

शहाबुद्दीनची (Mohammad Shahabuddin) दहशतच एवढी होती की निवडणुकीत जिंकून येण्यासाठी त्याला वेगळ्या प्रचाराची काही गरजच नव्हती. त्याच्या दहशतीमुळे त्याचा फोटो सिवानमधल्या प्रत्येक दुकानात लावलेला असायचा.

शहाबुद्दीनची (Mohammad Shahabuddin) दहशतच एवढी होती की निवडणुकीत जिंकून येण्यासाठी त्याला वेगळ्या प्रचाराची काही गरजच नव्हती. त्याच्या दहशतीमुळे त्याचा फोटो सिवानमधल्या प्रत्येक दुकानात लावलेला असायचा.

शहाबुद्दीनची (Mohammad Shahabuddin) दहशतच एवढी होती की निवडणुकीत जिंकून येण्यासाठी त्याला वेगळ्या प्रचाराची काही गरजच नव्हती. त्याच्या दहशतीमुळे त्याचा फोटो सिवानमधल्या प्रत्येक दुकानात लावलेला असायचा.

नवी दिल्ली 01 मे : राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन (Mohammad Shahabuddin) यांचं आज सकाळी कोविड-19 मुळे (Covid 19) निधन झालं. बिहारमधल्या 'जंगलराज'मधील गुन्हेगार राजकीय नेता अशी त्याची ओळख होती. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध होते. त्यातून त्याचा राजकीय क्षेत्रात उदय झाला आणि त्याचं उपद्रवमूल्य अधिक वाढत गेलं.

बिहारमधल्या सिवान (Siwan) या पूर्वेकडच्या मतदारसंघातून शहाबुद्दीन चार वेळा खासदार म्हणून निवडून आला होता. ऑगस्ट 2004 मध्ये सिवान जिल्ह्यातल्या प्रतापपूर गावातल्या चंदाबाबू यांच्या सतीश आणि गिरीश रोशन या दोन मुलांच्या अंगावर अॅसिड ओतून त्यांची हत्या शहाबुद्दीन यानी केली होती. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे शहाबुद्दीन आणि त्याच्या माणसांनी या दोघांची हत्या केली होती.

सिवानच्या विशेष न्यायालयाने 9डिसेंबर 2015 रोजी शहाबुद्दीनसह चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा 30ऑगस्ट 2017 रोजी पाटणा हायकोर्टाने कायम ठेवली होती. तसंच, हा खटला पुढे सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस. के. कौल आणि न्या.के. एम. जोसेफ यांच्या पीठानेही ती शिक्षा कायम ठेवली होती.

11 वर्ष तुरुंगात राहून सप्टेंबर 2016 मध्ये शहाबुद्दीन तुरुंगातून सुटला होता. त्यावेळी त्याच्या स्वागताला तब्बल 1300 गाड्यांचा ताफा आला होता. शहाबुद्दीन पहिल्यापासूनच लालूप्रसाद यादव यांच्यासोबत होता. शहाबुद्दीनची दहशतच एवढी होती की निवडणुकीत जिंकून येण्यासाठी त्याला वेगळ्या प्रचाराची काही गरजच नव्हती, असं 'लल्लनटॉप डॉट कॉम'च्या वृत्तात म्हटलं आहे. त्याच्या दहशतीमुळे त्याचा फोटो सिवानमधल्या प्रत्येक दुकानात लावलेला असायचा.

त्याच्या नावावर अनेक गुन्हे आहेत. 1986 मध्ये हुसेनगंज पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पहिलं एफआयआर दाखल झालं होतं. त्यानंतर अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल झाले. सिवान जिल्ह्यात प्रत्येकजण शहाबुद्दीनला घाबरून असे. कोणी आपलं उत्पन्न जाहीर करत नसे, समारंभात किती खर्च झाला, याची चर्चा करत नसे. कार घेण्याची क्षमता असली, तरी असे लोक दुचाकीने प्रवास करणं पसंत करत आणि गरीब लोक तर पायीच जात. कारण उत्पन्न वाढल्याची खबर शहाबुद्दीनच्या माणसांना मिळाली, तर ते खंडणी वसूल करायला येत. खंडणी दिली नाही, तर त्याची माणसं थेट मारायचीच.

शहाबुद्दीनला या दहशतीतूनही जनाधार मिळत गेला. पोलिसांवर गोळीबार, कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचं अपहरण, हत्या असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. वयाच्या 23 व्या वर्षी 1990 साली तो आमदार झाला. तो दोनदा आमदार, तर चार वेळा खासदार म्हणून निवडून आला. 1996 मध्ये तो केंद्रीय राज्यमंत्रीही झाला असता; मात्र त्याचवेळी एक प्रकरण उघडकीला आल्यामुळे तसं झालं नाही.

First published:
top videos

    Tags: Corona patient, Corona updates, Criminal, RJD