गुवाहाटी, 26 जून : कामादरम्यान अनेक मोहाचे प्रसंग येतात. मात्र आपण करीत असलेल्या कामाशी बांधिलकी असली तर असे अनेक प्रसंग आले तरी आपलं मन डगमगत नाही. असं एक आदर्श उदाहरण आसाममधील होमगार्डने समोर ठेवलं आहे. सध्या या होमगार्डचं देशभरात कौतुक केलं जात आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी शनिवारी एका होमगार्डला पोलीस कॉन्स्टेबलच्या पदावर नियुक्त केलं आहे. होमगार्डला ड्रग्स तस्कर लाच देत होते, मात्र होमगार्डने ते घेण्यात नकार दिला होता. होमगार्डच्याच मदतीने पोलिसांनी प्रतिबंधित औषधं क्रिस्टल मेथामफेटामाइन जप्त केलं. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 12 कोटी इतकी किंमत आहे. मुख्यमंत्र्यांनी शनिवारी 35 वर्षीय बोर्सिंगचं अभिनंदन केलं आणि त्यांच्याकडे नियुक्ती पत्र सोपवलं. बोर्सिंग बे आपल्या कामामुळे आता राज्यभरात हिरो बनले आहेत. लोक त्यांना नायक म्हणत आहेत. त्यांच्या मदतीमुळे प्रतिबंधिक औषधांची मोठी खेप पकडण्यात यश आलं आहे.
24 जून रोजी आसाम कॅबिनेटने बोर्सिंग बे यांना आसाम पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. आसामचे डीजीपी भास्कर ज्योती महंत यांनी 21 जून रोजी पोलिसांना 5 किलो मेथामफेटामाइन जप्त करण्यात मदत केल्यानंतर बोर्सिंग बे यांना 1 लाख रुपयांच्या बक्षीसाने गौरविण्यात आलं होतं. बोर्सिंग बे कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील डिल्लई पोलीस स्टेशनशी संबंधित आहेत.
हे ही वाचा-मटण नाही तर लग्नही नाही; भडकलेल्या नवरदेवाचा भरमंडपात सप्तपदींसाठी नकार
ड्रग्ज तस्करांनी लाच देण्याचा केला होता प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, 21 जून रोजी पोलिसांनी मणिपूरहून येणाऱ्या एक ट्रकला कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील डिल्लई चेक पोस्टवर थांबवलं होतं. चेंकिगजरम्यान बोर्सिंग बे ने ट्रकमधून 3 किलो मेथामफेटामाइनच्या गोळ्या जप्त केल्या होत्या. तपासणीदरम्यान त्यांनी बोर्सिंगला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने यास नकार दिला आणि तब्बल 12 कोटी रुपयांचे मेथामफेटामाइनच्या गोळ्या जप्त करण्यात मदत केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assam, Positive story