Home /News /national /

INDORE : आधी मैत्री नंतर न्यूड व्हिडीओ कॉल, प्रेयसी फसवायची अन् प्रियकर पैसे मागायचा, पण...

INDORE : आधी मैत्री नंतर न्यूड व्हिडीओ कॉल, प्रेयसी फसवायची अन् प्रियकर पैसे मागायचा, पण...

तक्रारकर्त्याने सांगितले की, त्यांच्यासोबत आधी एका तरुणीने मैत्री केली.

    इंदूर (मध्यप्रदेश), 8 जून : इंस्टाग्रामवर फेक प्रोफाईल (Fake Profile on Instagram) बनवून मुला-मुलींशी मैत्री करणाऱ्या, तसेच प्रेमाचे नाटक करुन त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनविणाऱ्या एका टोळीचा इंदूर गुन्हे शाखेने (Indore Crime Branch) पर्दाफाश केला आहे. प्रेमाचे नाटक करुन आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्यानंतर त्यांना धमकावून अवैध वसूली केली जात होती. या टोळीने आतापर्यंत 20 जणांना आपले शिकार बनवले. पोलिसांनी आरोपींचा मोबाईल जप्त केल्यानंतर ते तपासले जात आहेत. तसेच त्यांच्या बँक खात्याचीही चौकशी केली जात आहे. पाच आरोपींमध्ये एका युवतीचाही समावेश आहे. सर्व जण मूळचे रीवा येथील रहिवासी आहेत. रीवा येथील हिमांशु तिवारी आणि त्याची प्रेयसीने सर्वात आधी ब्लॅकमेलिंगचा (Blackmailing) खेळ सुरू केला होता. त्यानंतर हिंमाशुने रीवाकडूनच आपल्या अन्य मित्रांनाही बोलवून घेतले. हे सर्वजण मिळून सेक्सटोर्शन करत होते. अशाप्रकारे करायचे फसवणूक - इंदूर गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार आली होती. तक्रारकर्त्याने सांगितले की, त्यांच्यासोबत आधी एका तरुणीने मैत्री केली. यानंतर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. इतकेच नव्हे तर त्यांच्यसोबत अश्लिल व्हिडिओही (Abusive Video) बनवला. यानंतर ती तरुणी तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागली. नंतर असे दिसून आले की, या गेममध्ये त्याचे आणखी भागीदार आहेत. या टोळीत अनेक तरुणांचा सहभाग असल्याची तक्रार तक्रारदाराने पोलिसांकडे केली होती. प्रियकर प्रेयसीने केला ब्लॅकमेलिंगचा खेळ - पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रीवा येथील हिमांशु तिवारीला अटक केली. यानंतर त्याची चौकशी केली असता तो स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी रीवाहून इंदूर इथे आला होता. मात्र, नंतर त्याने आपल्या प्रेयसीच्या मदतीने ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला. हिमांशुची प्रेसयी फेक अकाऊंटवरुन स्वत:च्या आवाजात संदेश पाठवायची. यानंतर मैत्री झाल्यानंतर सुरुवातीला प्रेमाच्या गोष्टीही करायची. अनेकदा ही तरुणी स्वत: व्हिडिओ कॉल करायची आणि संवादादरम्यान, अनेकदा स्वत:चे कपडेदेखील काढून घ्यायची. इतकेच नव्हे तर ज्याच्यासोबत पण ती व्हिडिओ कॉलवर बोलायची त्यालादेखील कपडे काढायला उत्तेजित करायची. यानंतर मग ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होत होता. हेही वाचा - माजी सरंपचाचा मुलगा ब्लॅकमेल करून करायचा बलात्कार, अखेर 'ती'ने गळा दाबून संपवलं! टोळीचे काही सदस्य आपण पोलीस निरीक्षक असल्याचे सांगत फोन करायचे. यानंतर शेवटी पैसे घेतल्यानंतर इन्स्टाग्राम आणि इतर सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांना ब्लॉक करुन टाकायचे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी इंदूरच्या लसूडिया पोलीस ठाणे परिसरातील स्कीम नंबर 136 इथे राहतात. या टोळीने आतापर्यंत दोन डझनहून अधिक लोकांकडून लाखो रुपये वसूल केले आहेत. तसेच पोलीस त्यांच्या बँक खात्यांची माहिती जमा करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Indore News, Online crime

    पुढील बातम्या