

अमेरिकेतील न्यायाधीशांनी एका कुटुंबाला 74 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सुनावला आहे. या प्रकरणात नर्सने गर्भवती महिलेला चुकीचं इंजेक्शन दिलं होतं. महिला एका कम्युनिटी क्लिनिकमध्ये बर्थ कंट्रोलचं इंजेक्शन घेण्यासाठी गेली होती. मात्र तिला फ्लूचं इंजेक्शन देण्यात आलं.


चुकीचं इंजेक्शन लावल्यानंतर दाम्पत्याला अपंग मुलगी जन्माला आली. न्यायाधीशांनी मुलीसाठी 55 कोटी रुपये आणि दाम्पत्याच्या नुकसानभरपाईसाठी 18 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.


न्यायाधीशांनी सांगितलं की, मुलीचे उपचार, शिक्षण आणि अन्य खर्चासाठी पैसे दिले जात आहे. रिपोर्टनुसार येसेनिका पचेका नावाच्या महिलेला आई व्हायचं नव्हंत. मात्र नर्सने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळी ती गर्भवती राहिली.


महिलेने एका सरकारी क्लिनिकमध्ये इंजेक्शन घेतलं असल्याने अमेरिकेच्या सरकारला या चुकीसाठी जबाबदार ठरविण्यात आलं आहे. या नुकसानभरपाईसाठी दाम्पत्याला तब्बल 5 वर्षे कोर्टात लढावं लागलं.