नवी दिल्ली, 07 मे : एका साडेचार वर्षांच्या मुलीने पुस्तक लिहून 'द यंगेस्ट ऑथर ऑफ द वर्ल्ड' हा किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे पुस्तक लिहिणारी मुलगी केजीच्या वर्गात शिकते.
प्रविका असे या अतिशय हुशार मुलीचे नाव आहे. या किताबासाठी सन्मानित झालेली ती पहिली भारतीय आहे. प्रविकाची आई प्रज्ञा प्रांजली यांनी सांगितले की, प्रविका वसुंधरा सेक्टर 6 येथील एमिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये केजीच्या वर्गात शिकते.
दिल्लीला लागून असलेल्या यूपीच्या गाझियाबादमध्ये साडेचार वर्षांच्या मुलीनं पुस्तक लिहून इतिहास रचला आहे. 'आज तक'ने याचं वृत्त दिलं आहे. 4 वर्षे 6 महिन्यांच्या एका लहान मुलीने 'द लायन अँड द बोन' नावाचे पुस्तक लिहिले आहे. ज्यासाठी तिला वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड 2022 द्वारे 'द यंगेस्ट ऑथर ऑफ द वर्ल्ड' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
तिच्या आईने सांगितले की, तिला अभ्यासासोबतच कला, चित्रकला यासारख्या गोष्टी लवकर समजतात. ही प्रक्रिया 1 वर्षाच्या कालावधीपासून झाल्याचे त्यांनी सांगितले. प्राविकाच्या आईने सांगितले की, पुस्तकासाठी नामांकन प्रक्रिया खूप कठीण होती.
टिळक तन्वर, आरजे आरती आणि राशी यांनी मुलीला पुस्तकातील कथा योग्य प्रकारे साकारण्यासाठी मदत केली आहे. टिळक तन्वर हे स्वतः गिनीज खिताब विजेते आहेत, असेही तिच्या आईने सांगितले.
हे वाचा - गलवानमध्ये जवान झाला शहीद, दोघांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न पत्नीनं असं केलं पूर्ण
प्रज्ञा प्रांजली यांनी सांगितले की, शाळेच्या शिक्षिका गरिमा सक्सेना आणि आशा झुनझुनवाला यांचाही या कामात मोठा वाटा आहे, त्यांनी प्रविकाला जॉली फिनिक्सच्या माध्यमातून वाचायला आणि लिहायला शिकवले, त्यानंतर प्रविकाने स्वतः संपूर्ण पुस्तक लिहिले.
हे वाचा - मुस्लीम मुलीशी विवाह केलेल्या त्या तरुणानं या कारणानं विकली स्वतःची सोनसाखळी
पुस्तकातील प्रत्येक शब्द आणि चित्रण स्वतः प्रविकाने केले आहे. हे पुस्तक माणुसकी आणि मैत्रीसारख्या सद्भावनेवर आधारित आहे. वर्ड बुक ऑफ टॅलेंटने 2022 मध्ये गेल्या 3 वर्षांतील मुलांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आणि कथांचा आढावा घेतला आहे, त्यांनी प्रविकाच्या पुस्तकातील इतर सर्व तपशील तपासल्यानंतर, तिला हा पुरस्कार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Small girl