Elec-widget

रघुराम राजन यांनी टोचले मोदी सरकारचे कान, टीका ऐकून न घेतल्याने मोठ्या चुका

रघुराम राजन यांनी टोचले मोदी सरकारचे कान, टीका ऐकून न घेतल्याने मोठ्या चुका

सरकार तोपर्यंत आनंद साजरा करू शकते जोपर्यंत वाईट परिणाम समोर येणार नाहीत असं रघुराम राजन म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा सरकारच्या चुकांकडे बोट दाखवलं आहेत. त्यांनी म्हटले की, टीका करणाऱ्यांचे ऐकून न घेता सरकार योजना तयार करत आहे. त्यात चुका होत आहेत. जर टीका करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं तोंड बंद करायला सांगितलं किंवा त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं तर लोक चुका दाखवणे बंद करतील. त्यानंतर सरकार तोपर्यंत आनंदी राहू शकतं जोपर्यंत त्याचे वाईट परिणाम समोर येणार नाहीत. सत्य फार काळ नाकारता येणार नाही असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

रघुराम राजन यांनी म्हटलं की, इतिहासात रममाण होणं, परदेशी विचारांना विरोद आणि त्यांच्याबद्दल असुरक्षिततेची भावना आर्थिक विकासाला खीळ घालते. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं सरकारच्या योजनांवर टीका करणाऱ्या दोन सदस्यांना हटवण्यावरून विचारलं आहे. राजन यांनी एका ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, खुल्या टीका सरकारसमोर सत्य मांडण्याची संधी देतात. त्यांनी सांगितलं की, इतिहास समजून आणि उमजून घेणं चांगली बाब आहे. मात्र, नेहमीच इतिहासात रमून जाणं असुरक्षितता दाखवते. यामुळे आपली सध्याची ताकद वाढण्यास मदत मिळत नाही.

आपल्याकडे ऐतिहासिक गोष्टींमुले सध्याची व्यवस्था चांगली करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होता कामा नये असं राजन यांनी म्हटलं आहे. याआधी राजन यांनी म्हटलं होतं की, आर्थिक मंदी चिंतेचा विषय आहे. सरकारला याच्याशी दोन हात करताना उर्जा आणि एनबीएफसी विभागातील प्रश्न सोडवावे लागतील. तसेच खाजगी क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी बदल करायला हवेत.

सध्या असलेल्या आर्थिक संकाटीचा अंदाज नाही. पण जर असं काही झालं तर त्याचं एकच कारण नसेल. या वेळी मंदीसाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सध्या आर्थिक क्षेत्रात कोणतीही अडचण नाही. खरंतर व्यवसायात मंदीसोबतच जागतिक गुंतवणुक चिंतेचं कारणं आहे असं रघुराम राजन म्हणाले.

वाचा : मोदी सरकार पुन्हा RBI च्या दारात, करणार 30 हजार कोटींची मागणी?

Loading...

समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर मोठी अडचण होऊ शकते. सध्या देशापेक्षा जगाच्या दृष्टीनं विचार करायला हवा. याऊलट देशात फक्त आपल्याच फायद्याकडं लक्ष दिलं जात आहे. सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जुन्या चुका सुधारल्याने नव्या समस्या निर्माण होणार नाहीत अस नव्हे असेही रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं.

Special Report- गौतम बुद्ध उपयोगाचा नाही- संभाजी भिडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...