जम्मू, 26 सप्टेंबर : काँग्रेसचे माजी नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी अखेर सोमवारी त्यांच्या नव्या पक्षाच्या नावाची घोषणा केली. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव डेमोक्रॅटिक आझाद पार्टी असे ठेवले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत काँग्रेस पक्षाला गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर गुलाम नबी आझाद यांनी स्वबळावर नवा पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या नव्या पक्षाच्या नावाबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. अखेर त्यांनी आपल्या नवीन पक्षाचे नाव जाहीर केले आहे. काँग्रेस पक्षाला दिली होती सोडचिठ्ठी - गुलाम नबी आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व सोडले होते. तेव्हापासून त्यांच्याकडून नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. स्वत: गुलाम नबी आझाद यांनी अनेक प्रसंगी याचे संकेत दिले होते. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर समर्थकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी सोमवारी गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘लोकांनी मला नवीन पक्षासाठी सुमारे 1500 नावे पाठवली होती. यातील अनेक नावे उर्दू आणि संस्कृतमध्येही होती. त्यात हिंदुस्थानी सारखे हिंदी आणि उर्दूचे मिश्र नावही होते. मला माझ्या पक्षाचे नाव लोकशाही, शांतताप्रिय आणि स्वातंत्र्याचे प्रतीक प्रदर्शित करेल असे द्यायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गुलाम नबी आझाद नव्या पक्षाच्या नावाची घोषणा करण्याच्या तयारीत होते. ते रविवारी 3 दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर पोहोचले. वेळापत्रकानुसार, गुलाम नबी आजपासून 27 सप्टेंबरपर्यंत श्रीनगरमध्ये असतील, त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील. हेही वाचा - राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला थेट हॉलीवूडमधून पाठिंबा! अभिनेत्यानं ट्विट करत म्हटलं.. जम्मूला पोहोचल्यावर गुलाम नबी आझाद हे कार्यकर्ते आणि नेत्यांची बैठक घेणार आहेत. नवरात्रीमध्ये आझाद यांच्या पक्षाच्या नावाची घोषणा करण्यात येणार, अशी शक्यता आधीच व्यक्त केली जात आहे. अखेर त्यांच्या पक्षाच्या नावाची घोषणा त्यांनी केली आणि डेमोक्रॅटिक आझाद पार्टी असे त्यांच्या पार्टीचे नाव त्यांनी ठेवले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.