नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रे’ला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. दररोज 21 किमी चालल्यानंतर, 150 दिवसांत 3 हजार 570 किमी अंतर कापून ही काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. या यात्रेला आता हळूहूळ पाठींबा मिळताना दिसत आहे. यात्रेच्या अठराव्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनाला थेट हॉलीवूडमधून पाठिंबा मिळाला आहे. भारत जोडो आंदोलनाला हॉलीवूडमधून पाठिंबा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या अठराव्या दिवशी विशेष घटना घडली आहे. या आंदोलनाला थेट हॉलीवूडमधून पाठिंबा मिळाला आहे. जॉन क्यूसैक या हॉलीवुड अभिनेत्याने ट्विट करुन याला पाठिंबा दर्शवला आहे. 56 वर्षीय अभिनेत्याने ट्विटरवर लिहिले की, “भारतीय खासदार राहुल गांधी काश्मीर ते केरळ प्रवास करत आहेत.” त्याच्या ट्विटवर, एका वापरकर्त्याने अभिनेत्याचे आभार मानले ज्याला त्याने उत्तर दिले, ‘होय - एकता - सर्वत्र सर्व फॅसिस्टांविरुद्ध.’ याआधीही या अभिनेत्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याशिवाय त्यांनी नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थनही केले. केरळमध्ये 450 किमी अंतर कापणार भारत जोडो यात्रा 10 सप्टेंबर रोजी केरळमध्ये दाखल झाली. या राज्यात ही यात्रा 450 किमी अंतर कापणार असून त्यादरम्यान ती सात जिल्ह्यांतून जाणार आहे. 1 ऑक्टोबरला कर्नाटकात प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची भारत जोडो यात्रा 150 दिवसांत 3,570 किमी अंतर कापणार आहे. 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरुवात झाली असून जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे. वाचा - राष्ट्रवादी खरंच सोडणार का? अमित शहांच्या भेटीबद्दल खडसेंचं स्पष्टीकरण राहुल दिल्लीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या भारत जोडो यात्रेच्या विश्रामाच्या दिवशी राहुल गांधी राष्ट्रीय राजधानीत असल्याच्या अनेक बातम्या आल्या. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाले की, काही टीव्ही चॅनेल्स आणि प्रिंट मीडियाने ह्या खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. राहुल गांधी आज कंटेनरमध्ये दिवस घालवत आहेत, जो भारत जोडो यात्रेचा विश्रांतीचा दिवस आहे. भारत जोडोच्या प्रवाशांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून राहुल गांधी चालकुडी येथे विश्रांती घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिला सुरक्षित असतील तरच देश पुढे जाईल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी मुरादाबाद आणि उत्तराखंडमधील घटनांवर शोक व्यक्त केला. महिला सुरक्षित असतील तेव्हाच भारताची प्रगती होईल, असे ते म्हणाले. राहुल गांधींनी ट्विट करून म्हटलं की, मुरादाबाद आणि उत्तराखंडमध्ये मुलींसोबत घडलेल्या घटनांनी सर्वांनाच धक्का बसला आहे. ते म्हणाले, माझ्या भारत जोडो यात्रेत मी अनेक प्रतिभावान तरुणींना भेटत आहे आणि ऐकत आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे की, आपल्या भारताची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा देशातील महिला सुरक्षित असतील. काँग्रेसची भारत जोडो यात्रा म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरुद्ध वातावरण निर्माण करण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. या यात्रेनिमित्त काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करणे आणि देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणे, तसेच पक्षात आणखी तरुण कार्यकर्त्यांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.