नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर: शिलाँग-गुवाहाटी राष्ट्रीय महामार्गावर जळीत कारची थरारक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत, कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. बर्निंग कारच्या थरारामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्डिनँड बंशानलांग लिंगदोह (ferdinand banshanlang lyngdoh death) असं संबंधित दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव असून ते मेघालयचे माजी मुख्यमंत्री ई. के. मावलोंग (Former CM E K Mawlong) यांचे सुपूत्र आहेत. मेघालयमधील काँग्रेसचे विद्यमान आमदार जॉर्ज लिंगदोह हे त्यांचे भाऊ असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. मृत फर्डिनँड लिंगदोह यांच्या नातेवाईकांनी घटनेची पुष्टी केली आहे. हेही वाचा- उपसरपंचाच्या जाचामुळे ग्रामसेवकाची आत्महत्या,Call रेकॉर्डिंग VIRAL झाल्याने खळबळ मृत फर्डिनँड बंशानलांग लिंगदोह हे इम्फाळमधील केंद्रीय कृषी विद्यापिठात एक प्राध्यापक म्हणून काम करत होते. दरम्यान काल शिलाँग-गुवाहाटी राष्ट्रीय महामार्गावर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. कारला नेमकी आग कशी लागली? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसून पोलिसांकडून आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.