Home /News /ahmednagar /

उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची Suicide, दोघांमधील संभाषणाचं रेकॉर्डिंग VIRAL, नगरमध्ये खळबळ

उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची Suicide, दोघांमधील संभाषणाचं रेकॉर्डिंग VIRAL, नगरमध्ये खळबळ

Gramsevak commits suicide, audio clip goes viral: ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा धबधब्यावरुन उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं.

अहमदनगर, 3 ऑक्टोबर : उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने आत्महत्या (Gramsevak commits suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar district) श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव - वडघुल या गट ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे (Gramsevak Jhumbar Murlidhar Gavande) यांनी सौताडा धबधब्यावरुन (Sautada waterfall) उडी घेऊन 24 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी आत्महत्या केली होती त्या धबधब्यावरील घटनास्थळी गवांदे यांची बॅग, आयकार्ड, मोटरसायकल मिळाली होती मात्र आठ दिवसांपासून मृतदेहाचा शोध सुरू होता. आठ दिवसांनी आढळला आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकाचा मृतदेह आढळून आला. काल दुपारी त्यांची बॉडी सापडली होती या प्रकरणी बीड तालुक्यातील सौंदांडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र खांडगाव - वडघुलचे उपसरपंच राम घोडके यांच्या त्रासला कंटाळून गवांदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होत असून दोषींवर कारवाईचे करण्याची मागणी मयताच्या पत्नीने केली आहे. या प्रकरणातील उपसरपंच राम घोडके आणि ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या आहेत. व्हायरल झालेल्या या रेकॉर्डिंगमध्ये गावातील फॉरेस्ट हद्दीत असलेल्या दिडशे घरांची नियमबाह्य नोंद लावण्यासाठी उपसरपंच राम घोडके यांच्याकडून ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यासोबतच त्यांची इतरही काही कामे घोडके यांनी सांगितले होती. ती करण्यासाठी उपसरपंच राम घोडके हे दबाव टाकत होते. ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या विरोधात उपसरपंच रामा घोडके यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. तक्रर मागे घ्यायची असेल तर ही कामे करा असे संभाषण आहे. या घटनेने संपूर्ण नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पहावं लागेल. हे पण वाचा : बापाच्या कृत्याची चिमुकल्याला मिळाली शिक्षा; अखेर कृष्णा नदीत सापडला मृतदेह कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे दोन दिवसांपूर्वी एक हृदयद्रावक घटना घडली होती. येथील एका निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या लेकराला पंचगंगा नदीत फेकून दिलं होतं. या घटनेनंतर दोन दिवसांनी चिमुकल्याचा मृतदेह कृष्णा नदीत आढळून आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली. सिकंदर हुसेन मुल्ला असं अटक करण्यात आलेल्या 48 वर्षीय आरोपी बापाचं नाव आहे. तर अफान मुल्ला असं मृत पावलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी सिकंदर मुल्लाने मुलाच्या उपचाराचा खर्च परवड नाही, म्हणून पोटच्या लेकराला पंचगंगा नदीत फेकलं होतं. यानंतर आरोपीनं स्वत: घरी येऊन आपल्या नातेवाईकांना याची माहिती दिली होती. यानंतर नातेवाईकांनी आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं असता, आरोपीनं आपल्या गुन्ह्याच्या कबुली दिली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Ahmednagar, Crime, Suicide

पुढील बातम्या