मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus पासून बचाव करण्यासाठी लशीसारखं रक्षण करतो मास्क; नवीन माहिती आली समोर

Coronavirus पासून बचाव करण्यासाठी लशीसारखं रक्षण करतो मास्क; नवीन माहिती आली समोर

त्याचबरोबर टेस्टिंगची संख्याही वाढत असल्याने रूग्णांचं प्रमाणही वाढत आहे.

त्याचबरोबर टेस्टिंगची संख्याही वाढत असल्याने रूग्णांचं प्रमाणही वाढत आहे.

Coronavirus पासून बचाव करण्यासाठी मास्क उपयुक्त आहे, हे वारंवार सांगितलं जातं. पण व्यवस्थित मास्क घातला तर केवळ विषाणूपासून संरक्षण होतं असं नाही, तर तुमची प्रतिकार क्षमताही वाढते, असं नव्या संशोधनानी सिद्ध झालं आहे.

लंडन, 26 सप्टेंबर : Coronavirus पासून बचाव करण्यासाठी मास्क उपयुक्त आहे, हे वारंवार सांगितलं जातं. पण व्यवस्थित मास्क घातला तर केवळ विषाणूपासून संरक्षण होतं असं नाही, तर तुमची प्रतिकार क्षमताही वाढते, असं नव्या संशोधनानी सिद्ध  झालं आहे. म्हणजेच मास्क लशीसारखं काम करतो, असं संशोधन एका मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हे गृहितक मांडण्यात आलं आहे. त्यानुसार प्रतिकारशक्तीबाबत सिद्धता नसली तरी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घातल्यामुळे  विषाणूचा प्रभाव कमी होतो. मास्कमुळे कोरोनाबाधिक व्यक्तीच्या संसर्गजन्य ड्रॉपलेट्सपासून संरक्षण मिळतं. शिंकताना, खोकताना हे ड्रॉपलेट्स बाहेर उडतात, तेव्हा हजारो विषाणू त्या ड्रॉपलेट्समध्ये असतात. त्यातलाच एखादा तुमच्या शरीरार गेला तर Covid-19 चा संसर्ग होतो. त्यामुळे मास्कमुले विषाणूचा प्रभाव कमी होते हे गृहितक सत्य निघाल्यास मास्क हे एका लशीसारखं काम करतील.

विषाणूचं शरीरातील प्रमाण किती यावरून गंभीर लक्षणांचा निष्कर्ष काढता येतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीने मास्क परिधान केल्यास ते ड्रॉपलेट मास्कमध्ये अडकून विषाणूंचं प्रमाण आपोआप कमी होतं आणि संसर्ग थांबतो, असं संशोधकांनी म्हटलं आहे. जागितक आरोग्य संघटनेनी (WHO) मास्क घालण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. भारतात तर मास्क परिधान करणं सक्तीचं करण्यात आलं आहे. लॉकडाउनदरम्यान आणि नंतरही मास्क वापरण्याचा नियम आणि सक्ती करण्यात आली आहे.

मास्कचा वापर वाढल्यानं डॉ. शैलजा गुप्ता यांनी घरगुती मास्कची संकल्पना समोर आणली होती. दाट लोकसंख्येच्या देशात अलगीकरण सोशल डिस्टन्सिंग हे कठीण असल्याचे डॉ. गुप्ता यांनी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळे भारतात मास्क हाच महत्त्वाचा उपाय असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आमचे मास्क हे उपयोगी ठरतील का नाही हा वादाचा मुद्दा बनला होता. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेनी आणि अनेक संशोधकांनी हे स्पष्ट केले की, कोविड हे एअरसोलच्या माध्यमातून पसरतात.

कोरोना विषाणूचा प्रसार हा शक्यतो बाधिताच्या संपर्कात आल्याने त्याच्या तोंडातल्या किंवा नाकातल्या ड्रॉपलेटच्या संपर्कात आल्याने तसंच पृष्ठभागावर विषाणू असताना त्याला हाताचा संपर्क झाल्यास  आणि तो हात आपल्या नाकातोंडाला लागल्यास या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे आपलं नाक आणि तोंड झाकणं हा यावर मोठा उपाय असून, त्यासाठी मास्क हे अत्यंत उपायुक्त असल्याचं लक्षात आलं आहे. हेच मास्क खर्‍या लशीप्रमाणे काम करणार आहेत, असे संशोधकांचं म्हणणं आहे. शिवाय त्याने विषाणूचा प्रभाव कमी होईल, प्रतिकारशक्ती वाढण्यास मदतही होईल.

First published:

Tags: Coronavirus, Mask