Home /News /national /

PM Mudra Loan देणारं 'ते' पत्र बनावटी; PIB Fact Check मध्ये मोठा खुलासा

PM Mudra Loan देणारं 'ते' पत्र बनावटी; PIB Fact Check मध्ये मोठा खुलासा

व्हेरिफिकेशन आणि प्रक्रिया शुल्क म्हणून 4500 रुपये दिल्यास कोणाही व्यक्तीला 10 लाखांपर्यंत पीएम मुद्रा योजनेतून कर्ज मिळू शकेल, असा दावा केला जात आहे.

    नवी दिल्ली, 23 मे : केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता ऑफलाईन सोबत ऑनलाईन प्रक्रिया (Online Process) राबवली जाते. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता यावी, तसंच योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावा, हा यामागील उद्देश आहे. योजनांची प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे फसवणुकीचे (Fraud) प्रकारही वाढताना दिसत आहेत. नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रबोधनही केलं जात आहे. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेबाबत सध्या एक पत्र व्हायरल (Viral) होत आहे. याबाबतच्या मेसेज किंवा ईमेलमध्ये 4500 रुपये द्या आणि 10 लाख रुपयांचे मुद्रा कर्ज (Mudra Loan) मिळवा, असं सांगण्यात येत आहे. परंतु, या जाळ्यात कोणी लाभार्थी अडकू नये, यासाठी केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण विभागअंतर्गत असलेल्या `पीआयबी`ने (PIB) याबाबत फॅक्ट चेक (Fact Check) करत व्हायरल होत असलेलं असं पत्र बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. देशात स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकारने पंतप्रधान मुद्रा योजना (PM Mudra Yojana) सुरू केली. 2015-16 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजने अंतर्गत सरकार बॅंका आणि एनबीएफसीच्या माध्यमातून बिगर कॉर्पोरेट छोट्या व्यावसायिकांना विनातारण कर्ज उपलब्ध करुन देते. या योजनेंतर्गत सरकार तीन श्रेणींमध्ये कर्ज वितरित करतं. या योजनेतून शिशू गटासाठी 50,000 रुपये, किशोर गटासाठी 50,000 रुपये ते 5 लाख रुपये आणि तरुण गटासाठी 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्जवाटप केलं जातं. आतापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या या योजनेतून कर्ज मिळण्याविषयी आमिष दाखवून फसवणूकीचा प्रयत्न केला जात आहे. काही लोकांना एक पत्र मिळालं असून, त्यात पीएम मुद्रा योजनेची यशोगाथा लोकांना सांगितली गेली आहे. तसेच व्हेरिफिकेशन आणि प्रक्रिया शुल्क म्हणून 4500 रुपये दिल्यास कोणाही व्यक्तीला 10 लाखांपर्यंत पीएम मुद्रा योजनेतून कर्ज मिळू शकेल, असा दावा केला जात आहे. `पीआयबी`ने या पत्राची संपूर्ण शहानिशा केली आहे. अर्थ मंत्रालयानं (Finance Ministry) असं कोणतंही पत्र जारी केलंल नाही. हे पत्र बनावट आहे, असं ‘पीआयबी फॅक्ट चेक’मधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अशा स्वरुपाचं कोणतंही पत्र असलेला ईमेल किंवा मेसेज आला तर त्याकडे दुर्लक्ष करावं. फसवणूक करणाऱ्यांच्या कोणत्याही जाळ्यात नागरिकांनी आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी अडकू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
    First published:

    Tags: Loan, Narendra modi, PIB, Prime minister

    पुढील बातम्या