Alert! कोरोनापाठोपाठ आता देशात आफ्रिकी स्वाइन फ्लूचं संकट

Alert! कोरोनापाठोपाठ आता देशात आफ्रिकी स्वाइन फ्लूचं संकट

आसाममध्ये या फ्लूचा पहिला रुग्ण समोर आल्यानं आता चिंता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

गुवाहाटी, 04 मे : देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. जवळपास कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारवर पोहोचला आहे. आधीच महासंकट असताना त्यामध्ये आणखीन एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनापाठोपाठ आता देशात आफ्रिकी स्वाइन फ्लूचं संकट आहे. रविवारी आसाममध्ये या फ्लूचा पहिला रुग्ण समोर आल्यानं आता चिंता व्यक्त केली जात आहे. या प्लूमुळे 306 गावांमधील तब्बल 2500 डुक्कर मारण्यात आले आहेत. केंद्राकडून मान्यता मिळाल्यानंतरही डुकरांना ठार मारण्यापेक्षा या प्राणघातक संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार इतर कोणताही मार्ग अवलंब करेल, असे आसामचे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय मंत्री अतुल बोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी सांगितले की या रोगाचा कोरोना व्हायरसोबत काहीही संबंध नाही.

हे वाचा-मजूर, कामगारांकडून तिकीट आकारू नका, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे विनंती

2019 मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार डुकरांची संख्या 21 लाख वरून 30 लाखांवर गेली आहे. हा आजार डुकरांपासून पसरला जात असल्याचा दावा केल्यानं त्यांना ठार मारण्यात येत होतं. ज्या डुकरांना फ्लू झाला आहे केवळ अशाच डुकरांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे फ्लू माणसांपर्यंत पसरणार नाही. जेणेकरून संक्रमणाचा प्रसार होण्यापासून रोखता येईल, असं आवाहन केलं आहे.

आसाममध्ये सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार कोरोनाग्रस्तांची संख्या 42 वर पोहोचली होती. त्यापैकी 32 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांनी कोरोनावर यशस्वी लढा दिला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशभऱात कोरोनाग्रस्तांचा आकाडा 40 हजारवर पोहोचला आहे. 29 हजार 453 रुग्णावर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत 11 हजार 706 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारच्या 'या' स्कीममुळे लोकांचे वाचले 300 कोटी

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 4, 2020, 11:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading