ग्वाल्हेर, 15 जुलै : मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीसाठी विद्यार्थ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर कॅम्पसमधून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला शिवीगाळ करताना विद्यार्थ्याने गोळीबार केला. काय आहे संपूर्ण प्रकरण - या घटनेदरम्यान तेथे उपस्थित असलेल्या पालकांनी आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विद्यार्थ्यांमधील हाणामारी आणि गोळीबाराचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तर अन्य आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत. ग्वाल्हेर मुरार येथील सेंट पॉल शाळेत शिकणाऱ्या पीयूष मित्तल या बारावीच्या विद्यार्थ्याचा रोहित नावाच्या तरुणाशी वाद झाला होता. सायंकाळी शाळा सुटताच 4 ते 5 मुले दुचाकीवरून आली आणि रोहितने पियुषला शाळेबाहेर शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला. या घटनेदरम्यान तेथे उपस्थित असलेल्या पालकांनी आणि रस्त्याने जाणाऱ्यांनी हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणांपैकी एकाला पकडले. हेही वाचा - ‘ मैं बेवफा नही हूं…’, तळहातावर लिहून महिला शिक्षिकेचं टोकाचं पाऊल ग्वाल्हेरचे एएसपी राजेश दांडौटिया यांनी सांगितले की, जमावाने पकडलेल्या तरुणाची मुरार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पियुषच्या तक्रारीवरून रोहितविरुद्ध मुरार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रेमप्रकरणावरून वाद झाल्याचा संशय आहे. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाची चौकशी करून अन्य साथीदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.