जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'मैं बेवफा नही हूं...', तळहातावर लिहून महिला शिक्षिकेचं टोकाचं पाऊल

'मैं बेवफा नही हूं...', तळहातावर लिहून महिला शिक्षिकेचं टोकाचं पाऊल

'मैं बेवफा नही हूं...', तळहातावर लिहून महिला शिक्षिकेचं टोकाचं पाऊल

काही वर्षांपूर्वी इंदू यांचे लग्न भोपाळच्या चोला भागात राहणाऱ्या सुभाष नावाच्या व्यक्तीशी झाले होते. इंदू सरकारी शाळेत शिक्षिका होत्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाल, 15 जुलै : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका महिला शिक्षिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी महिला शिक्षिकेने तिच्या मृत्यूचे कारणही आपल्या तळहातावर लिहिल्याचे समोर आले आहे. इंदू साहू, असे मृत महिला शिक्षिकेचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण -  महिला शिक्षिकेने लिहिले की, ‘मी माझ्या स्वेच्छेने आत्महत्या करत आहे. आई आणि बाबा, माफ करा भावा, माझा मंगळ माझा जीव घेऊन गेला. इतकेच नाही तर महिलेने पतीच्या फोटोच्या मागे मैं वेवफा नहीं हूं म्हणजे मी विश्वासघातकी नाही, असे लिहिले आहे. सध्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेले नाही. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इंदू साहू असे मृत महिला शिक्षिकेचे नाव आहे. त्या रायसेन येथील होत्या. काही वर्षांपूर्वी इंदू यांचे लग्न भोपाळच्या चोला भागात राहणाऱ्या सुभाष नावाच्या व्यक्तीशी झाले होते. इंदू सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. तर त्यांचे पती संगीत शिकवतात. गुरुवारी पती सुभाष याने इंदूच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना दिली. तर मृताच्या भावाने त्याच्यावर खुनाचा आरोप केला आहे. बहिणीने ज्या खोलीत आत्महत्या केली त्या खोलीच्या शेजारच्या खोलीत तिचे सासरे बसले होते, असा त्यांचा दावा आहे. पण हे कसे होऊ शकते की त्यांना या घटनेची माहिती नाही. कुटुंबीयांचा आरोप आहे की, इंदूचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच तिच्यावर अत्याचार करत असे. लग्नादरम्यान मुलीला सोन्याचे दागिने दिले होते. मात्र, तरीही तिचा छळ होत असल्याचे मृत महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तर इंदूच्या हातावर सासरच्यांनीच सर्व गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. हेही वाचा -  Live in पार्टनरसोबत 8 वर्षात 14 वेळा गर्भपात; संतापलेल्या महिलेची आत्महत्या शिक्षिकेच्या आत्महत्येप्रकरणी एसीपी सचिन अतुलकर यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. मृताच्या हातावर लिहिलेले शब्द आणि तिचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल. यासोबतच महिलेचे फोन रेकॉर्डही तपासले जात आहेत. नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर आरोप केले आहेत. त्यांचीही चौकशी केली जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात